Shahrukh Khan : शाहरुखच्या फॅनचं खास सरप्राइज ; चक्क चंद्रावरील जमीन केली गिफ्ट

Shahrukh Khan : शाहरुख खानची फॅन फॉलोइंग फक्त भारतापुरती मर्यादित नाही. तर, तो जागतिक स्टार आहे. त्याचे चाहते शाहरुखला खूश करण्यासाठी विविध सरप्राइज देत असतात. असेच एक थक्क करणारे सरप्राइज त्याच्या चाहत्याने शाहरुखला दिले आहे.
Shahrukh Khan
Shahrukh Khan SaamTv
Published On

Shahrukh Khan : शाहरुख खानची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये शाहरुखची अशी एक फॅन आहे की ती शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी खास करत असते. ही शाहरुखची फॅन भारताची नसून ऑस्ट्रेलियाची आहे. शाहरुखच्या या फॅनचे नाव सँडी आहे. सँडीने शाहरुखला चंद्रावर जमीन असलेला पहिला हिंदी चित्रपट अभिनेता बनवण्यासाठी त्याच्या नावावर जमीन खरेदी केली. इतकंच नाही तर शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ती दरवर्षी काहीतरी खास करते.

अहवालानुसार, चंद्रावरील ज्या जागेवर सँडीने जमीन विकत घेतले आहे. त्याला सी ऑफ ट्रँक्विलिटी म्हणतात. शाहरुख खानने 2009 मध्ये झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. लूनर रिपब्लिक सोसायटी (एलएसआर) कडून दरवर्षी यासाठी प्रमाणपत्र मिळते, असे त्यांनी सांगितले होते.

Shahrukh Khan
Emergency New Trailer : इंदिरा इज इंडिया! कौरवांविरुद्ध युद्धाची घोषणा…; कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'चा दुसरा ट्रेलर आऊट

लुनार रिपब्लिक सोसायटी दरवर्षी शाहरुख खानला प्रमाणपत्र पाठवते

शाहरुख खान म्हणाला होता, 'दरवर्षी माझ्या वाढदिवशी एक ऑस्ट्रेलियन महिला माझ्यासाठी चंद्रावर थोडी जमीन खरेदी करते. ती काही काळापासून ते विकत घेत आहे, आणि मला लूनर रिपब्लिक सोसायटीकडून त्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ती मला याबाबत ईमेल देखील लिहिते.

Shahrukh Khan
Mukkam Post Devach Ghar : देवाच घर म्हणजे काय? ; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा टीजर लॉन्च!

फॅनने 2002 मध्ये हे काम केले होते

शाहरुख खान पुढे म्हणाला, "जगभरातील अनेक लोकांचे प्रेम मिळाल्याने मी स्वतःला खूप आभारी समजतो. 2002 मध्ये देखील या महिलेने शाहरुखच्या नावावर स्कोर्पियन नक्षत्रातील एका ताऱ्याचे नाव ठेवले होते. शाहरुख हा पहिला भारतीय अभिनेता ठरला ज्याच्या नावावर स्टार आहे. सँडी अजूनही शाहरुखसाठी काहीतरी खास करण्याचा विचार करत आहे. कदाचित, शाहरुखच्या पुढच्या वाढदिवसाला सँडी सूर्याशी संबंधित एक सरप्राईज गिफ्ट देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com