Karanvir Bohra Major Injured: करणवीर बोहराला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra News: मालिकेच्या शूटिंगदरम्यान करणवीर बोहराला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त मिळाले आहे.
Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major Injured
Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major InjuredSaam Tv
Published On

Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major Injured

‘सौभाग्यती भव: २’फेम करणवीर बोहरा हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून करणवीरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. करणवीर ‘सौभाग्यती भव: २’ मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान करणवीरला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त मिळाले आहे. मालिकेच्या शुटिंग दरम्यानच अभिनेत्याला ही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त मिळाले आहे. (Serial)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major Injured
Dhanush Son Yatra Fined By Chennai Police: धनुषच्या लेकाला पोलिसांनी ठोठावला दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

मीडिया रिपोर्टनुसार, करणवीरच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्याच गुडघ्याला मालिकेच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्याला दुखापत झाली आहे. त्याला गुडघ्याबरोबरच कोपर आणि हातालाही दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यामुळे शोचे शूटिंग काही वेळासाठी थांबवले आहे. करणला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. करणवीरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये तो शूटिंगदरम्यान जमिनीवर पडताना दिसत आहे. (Social Media)

अभिनेत्याला मालिकेचा एक सीन शुट करत असताना हा अपघात झाला आहे. अभिनेत्याच्या अपघाताचा व्हिडीओ ‘इंडिया फोरम्स’ या इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर केला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीबद्दल सांगायचे तर, मालिकेतले अनेक पात्र बसलेले दिसत आहेत. काही सदस्य हॉलमध्ये बसलेले दिसत आहेत. तिथून तो धावत येतो. धावत येत असतानाच त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यानंतर अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. (Actor)

Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major Injured
Dhanush Son Yatra Fined By Chennai Police: धनुषच्या लेकाला पोलिसांनी ठोठावला दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना करणवीर म्हणतो, ‘तुम्ही केलेल्या मेसेजबद्दल तुम्हासर्वांचे आभार, काल सेटवर शुटिंग दरम्यान माझा अपघात झाला, पण मी लवकरच शूटिंगला सुरुवात करतोय.’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली. करणवीर बोहराने आतापर्यंत ‘सौभाग्यती भव: २’सह ‘हम रहे ना रहे हम’, ‘बिग बॉस १२’, ‘ नागिन २’, ‘झलक दिखला जा ६’, ‘ये है आशिकी’, ‘लॉकअप’, ‘नच बलिए’सह अनेक मालिकेत त्याने काम केले आहे. (Entertainment News)

Saubhagyavati Bhava 2 Actor Karanvir Bohra Major Injured
Kiran Mane: ‘नितळ, परखड अन् सडेतोड बोलणारा माणूस...’; सातारच्या बच्चनने केले मनोज जरांगे पाटलांचं कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com