
Sanjay Datta : बॉलिवूड कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ नेहमीच थक्क करणारी असते. हे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी काहीही करू शकतात. पण तुम्ही क्वचितच ऐकले असेल की एखाद्या चाहत्याने त्याची सर्व मालमत्ता त्याच्या आवडत्या अभिनेत्याच्या नावावर केली आहे. संजय दत्तच्या बाबतीतही असेच काहीसे घडले जेव्हा त्याच्या एका चाहत्याने त्याची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता अभिनेत्याच्या नावावर केली. निशा पाटील नावाच्या एका चाहतीने मरण्यापूर्वी तिच्याकडे असलेले सर्वस्व अभिनेत्याच्या नावावर केले.
२०१८ मध्ये संजय दत्तला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की त्याची एका चाहती निशा पाटीलने, तिची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर केली आहे. निशाने बँकांना पत्र लिहून मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते. तथापि, संजय दत्तने ही मालमत्ता घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याच्या वकिलाने पुष्टी केली की अभिनेत्याचे निशा पाटीलशी कोणतेही वैयक्तिक संबंध नव्हते म्हणून तिची मालमत्ता स्वीकारणे त्याला योग्य वाटले नाही. संजू बाबाला त्याच्याबद्दलची इतकी क्रेझ पाहून आश्चर्यचकित झाला होता.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, संजय दत्तने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये यश आणि 'लिओ' मध्ये थलापती विजयसोबत दिसला होता. येत्या काळात, हा अभिनेता 'वेलकम ३' आणि इतर चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
याशिवाय संजय दत्त गुंतवणूक देखील करतो. त्यांनी अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २९५ कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी सुमारे ८-१५ कोटी रुपये घेतो. तसेच संजय दत्त एका क्रिकेट संघांचा सह-मालक देखील आहे. याशिवाय, त्याच्याकडे दुबई आणि मुंबईमध्ये मालमत्ता, लक्झरी कार आणि व्हिस्की ब्रँड देखील आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, संजू बाबा अशा प्रकारेही पैसे कमवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.