Famous Actor : मुलगी झाली हो! प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, फोटो शेअर करत दाखवली बाळाची पहिली झलक

Famous Actor Became Father : प्रसिद्ध अभिनेता बाप झाला आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
Famous Actor Became Father
Famous Actor SAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा

सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

बाळाची दाखवली पहिली झलक

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मराठमोळा अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) बाबा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेता राज हंचनाळे सध्या लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे'मध्ये जय खानोलकर (शायनर) च्या भूमिकेत दिसत आहे.

राज हंचनाळेच्या बायकोचे नाव मनीषा देसवाल (मॉली) असे आहे. मनीषाने १९ ऑक्टोबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला. राज आणि मनीषाच्या घरी लक्ष्मी आली आहे. लेकीच्या जन्मानंतर अभिनेता खूपच खुश आणि भावुक झाला आहे. सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

पोस्टमध्ये अभिनेत्याने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत मनीषा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पहिला फोटो हा दोघांच्या मिरर सेल्फीचा आहे. तर दुसऱ्या फोटोत अभिनेत्याच्या लेकीची पहिली झलक पाहायला मिळतेय. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते, कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Famous Actor Became Father
Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! 'या' सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

राज हंचनाळे पोस्ट

"१९ ऑक्टोबर २०२६

आयुष्यात काही क्षण असे असतात, जे तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकतात.

इतकं हतबल आयुष्यात कधीच वाटलं न्हवतं,आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला असह्य वेदनांमधून जाताना पाहणं आणि तरीही तिच्यासाठी काहीच करू न शकणं. आपण फक्त उभे असतो , तिच्या वेदनांचे साक्षीदार बनून. मनात एकच विचार येत असतो " देवा, मला तिच्यासाठी काहीतरी करू दे. तिच्या जागी मी हे सगळं सहन करू शकलो असतो तर..."

पण त्या क्षणी जाणवतं, प्रेम करणं आणि प्रेमासाठी वेदना सहन करणं यात किती मोठा फरक आहे.

आपण स्त्रियांबद्दल बोलतो, त्यांचा आदर करतो, त्यांना समान हक्क मिळावेत म्हणून चर्चा करतो. पण एका स्त्रीला आई होताना पाहिल्याशिवाय तिच्या सामर्थ्याची खरी जाणीव होते का?

ज्या वेदनांपुढे आपण असहाय होतो, त्याच वेदनांना सामोरं जाण्याचं धैर्य ती दाखवते. स्वतःच्या शरीराच्या, मनाच्या आणि अस्तित्वाच्या सीमा ओलांडून ती एका नव्या जीवाला या जगात आणते. त्या क्षणी स्त्री फक्त स्त्री राहत नाही...ती साक्षात देवी वाटते.

स्त्रीला कमी लेखणाऱ्या, तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभ करणाऱ्या आणि तिला स्वतःच्या समानतेसाठी लढायला भाग पाडणाऱ्या विचारांची लाज वाटते.

स्त्रियांनी समानतेसाठी लढणं थांबवावं...कारण त्या प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या पुढेच आहेत.

तिच्या वेदना मी वाटून घेऊ शकलो नाही, पण त्या वेदनांनी माझ्यातला माणूस बदलून टाकला. तिच्याबद्दलचं प्रेम आणखी वाढल , तिच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आणि तिच्या आईपणासमोर मी नतमस्तक झालो.

आज मला माझ्या मुलीला एक वचन द्यायचं आहे "तुला कधीही तुझं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कुणाशी लढावं लागू नये असं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. तुला शिकवेन की तू कोणाहीपेक्षा कमी नाहीस, तुझं स्वातंत्र्य आणि तुझा आवाज यांना स्वतःचं अस्तित्व आहे."

आज मी फक्त बाबा नाही झालो...आज मी स्त्रीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नव्याने बदलू शकलो.

मला तुझा खूप अभिमान आहे. या गरोदरपणात तुझ्या प्रवासाचा साक्षीदार आहे, तू खरा योद्धा आहेस, मी धन्य आहे.

तिथल्या सर्व स्त्रिया, खूप प्रेम आणि प्रचंड आदर!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com