Salman khan: भाईजानच्या मनात राम रहीम; रामजन्मभूमीचे घड्याळ हातात घालून सर्वांनाच केले आश्चर्यचकीत; किंमत जाणून व्हाल थक्क

Salman khan watch: बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'मुळे चर्चेत आहे. आता त्याने रामजन्मभूमी आवृत्तीचे घड्याळ घालून सोशल मीडियावरील चाहत्यांना खूश केले आहे.
salman khan watch
salman khan watchSaam Tv
Published On

Salman khan : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या त्याने पोस्ट केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंची विशेष चर्चा होत आहे. या फोटोंमध्ये त्याच्या हातातील घड्याळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमकं काय खास आहे या घड्याळात आणि का होते या घड्याळाची चर्चा जाणून घेऊयात.

सलमानने एक खास घड्याळ घातले

अभिनेता सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान भगव्या रंगाचे रामजन्मभूमीचे चित्र असलेले घड्याळ घातले आहे. त्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की ३० मार्च रोजी थिएटरमध्ये भेटू. या पोस्टद्वारे अभिनेत्याने बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

salman khan watch
Virat Kohli: किंग कोहली करणार टीव्हीवर डेब्यू? 'या' मालिकेत दिसणार विराट, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

नेटिझन्सचा उत्तम प्रतिसाद

प्रेक्षकांना अभिनेत्याची ही पोस्ट खूप आवडत आहे. अयोध्या राम मंदिराशी संबंधित सलमान खानचे घड्याळ पाहून, नेटिझन्स त्याला आपल्या संस्कृती आणि वारसेचे महत्व असल्याबद्दल कौतुक करत आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली की भाईजानच्या मनात राम आणि रहीम दोन्ही बसतात. याशिवाय इतर नेटकरी त्याच्या लूक आणि घड्याळाचे कौतुक करताना दिसत आहेत.

salman khan watch
Sachin Tyagi : मुस्लीम पत्नीसाठी 'हा' हिंदू अभिनेता ठेवतो रोजा; चाहते म्हणाले, 'समाजाला एकत्र आणण्यासाठी...'

या घड्याळाची किंमत माहित आहे का?

सलमान खानने घातलेले घड्याळ अयोध्या राम मंदिर, भगवान राम, भगवान हनुमान आणि इतर पवित्र प्रतीकांशी संबंधित आहे. एपिक एक्स राम जन्मभूमी रोझ गोल्ड एडिशन नावाचे हे अद्भुत घड्याळ लक्झरी ब्रँड जेकब अँड कंपनीचे आहे आणि त्याची किंमत ६१ लाख रुपये आहे. 'सिकंदर' प्रदर्शित होण्यापूर्वी, अभिनेत्याने हे घड्याळ घालून एक खास संदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com