Salman Khan Injured: 'टाइगर जख्मी है', 'टायगर 3'च्या सेटवर सलमान खानला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला...

'टाइगर जख्मी है', 'टायगर 3'च्या सेटवर सलमान खानला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला...
Salman Khan Injured
Salman Khan InjuredSaam Tv

Salman Khan Injured : अभिनेता सलमान खानच्या (salman khan age) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सलमान शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. याची माहिती खुद्द भाईजानने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे.

सलमान खानने सांगितले की, तो 'टायगर 3'च्या (tiger 3 salman khan release date) सेटवर जखमी झाला होता.

Salman Khan Injured
Aai Kuthe Kay Karte Serial Update: अरुंधतीचा वीणाला सल्ला, पण अनिरुद्धचा झाला संताप

सलमान खानने त्याच्या ट्विटर हँडलवर टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील नवीन फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीय. परंतु त्याच्या डाव्या खांद्यावर रिलीफ बँड दिसत आहे. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही जगाचे वजन तुमच्या खांद्यावर उचलले आहे, तेव्हा तो म्हणतो की, जागाच सोड पाच किलोचा डंबेल उचलून दाखव. Tiger Zakhmi Hai . #Tiger3 '' (salman khan news in marathi)  (Latest Entertainment News)

Salman Khan Injured
Supreme Court on the Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वरील बंदी उठवली, सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का

शाहरुखसोबत दमदार अॅक्शन सीन्स

दरम्यान, 'टायगर 3'मध्ये सलमानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. 'टायगर' फ्रँचायझीमधला हा तिसरा चित्रपट असून यावेळी सलमान आणि शाहरुख खान यांच्यात आमने-सामने येणार आहेत.

सलमान आणि शाहरुखमध्ये दमदार अॅक्शन सीन्स आपल्याला या चित्रपट पाहायला मिळणार आहे. या सीनसाठी आदित्य चोप्राने वेगळा जबरदस्त सेट बनवला आहे. हा सेट तयार करण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com