Ye Re Ye Re Paisa 3: 'या' चित्रपटाच्या चौथ्या भागात मला काम करायला...; सलमान खानने व्यक्त केली 'येरे येरे पैसा' मध्ये काम करण्याची इच्छा

Salman Khan: ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ye Re Ye Re Paisa 3 Salman Khan
Ye Re Ye Re Paisa 3 Salman KhanSaam tv
Published On

Ye Re Ye Re Paisa 3: ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी संगीताला उर्जा आणि झिंग दिली आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे. 'येरे येरे पैसा ३' या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून यंदाचा भाग आणखीन धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही.

Ye Re Ye Re Paisa 3 Salman Khan
Aamir Khan: 'सितारे जमीन पर'च्या स्क्रिनिंगला आमिर खान अन् गर्लफ्रेंड गौरी एकत्र, हातात हात घातले, नेटकरी म्हणाले...

या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणतो, ‘’ हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.’’

Ye Re Ye Re Paisa 3 Salman Khan
Salman- Aamir: सलमान खानला आमिरने दिली होती 'सितारे जमीन पर'ची ऑफर; भाईजान म्हणाला, मी तर हो म्हणालो होतो पण...

या म्युजिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “येरे येरे पैसा ३' ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.”

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’चे एनर्जेटिक टायटल साँग पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com