Salman Khan and Aamir Khan: आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आज म्हणजेच २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी काल रात्री मुंबईत 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे भव्य प्रदर्शन झाले. या दरम्यान अनेक बॉलिवूड स्टार आले होते, परंतु सलमान खानने स्क्रिनिंगमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानने पापाराझींसमोर असे काही सांगितले, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानने सांगितले की, चित्रपट करण्यापूर्वी आमिरने स्वतः त्याला 'सितारे जमीन पर'ची पटकथा ऑफर केली होती.
आमिरने सलमानला चित्रपट ऑफर केला होता
खरं तर, गुरुवारी मुंबईत आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये रितेश जेनिलीया सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पण, सलमान खानने आपल्या उपस्थितीने सर्वांचे मन जिंकले. दोन्ही खानने पापाराझींसमोर छान पोज दिली.
एवढेच नाही तर सलमानने कॅमेऱ्यासमोर आमिरसोबत खूप मजा केली. या दरम्यान सलमानने गंमतीत म्हटले, 'आमिरने तुम्हाला सांगितलं का?' त्याने मला या चित्रपटासाठी बोलवलं होत... मी गेलो आणि मला चित्रपट खूप आवडला... मी हो देखील म्हटले...पण मला फोन आला की 'मीच हा चित्रपट करत आहे.'
सलमान खान पुढे विनोदाने म्हणाला, 'मी चित्रपटाचे इतके कौतुक केले की आमिर म्हणाला, 'मी हा चित्रपट फाडून टाकेन'... हे उत्तम चित्रपट आहे.' यावेळी सलमान खानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तो काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खूपच देखणा दिसत होता. सलमान व्यतिरिक्त, शाहरुख खान, रेखा, जितेंद्र, आशा भोसले, फराह खान, विकी कौशल, जॅकी श्रॉफ, हिमेश रेशमिया, इम्रान खान, जुनैद खान, तमन्ना, आमिर खानची मुलगी इरा खान आणि जावई नुपूर देखील स्क्रिनिंगला उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.