Salman Khan
sikandar Saam Tv

Salman Khan : 'सिकंदर' बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवणार? भाईजाननं केली भविष्यवाणी, म्हणाला...

Sikandar Box Office Collection : 'सिकंदर'चा हिरो सलमान खानने चित्रपट किती कोटींची कमाई करणार हे सांगितले आहे. ट्रेलर लाँच वेळी सलमान खान नेमकं काय, म्हणाला जाणून घेऊयात.
Published on

'सिकंदर' (Sikandar ) चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा काल (23 मार्च)ला मुंबईत पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने 'सिकंदर'च्या कलेक्शनचा अंदाज वर्तवला आहे.

'सिकंदर'मधून सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. चित्रपटातील रश्मिका आणि सलमानची केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'सिकंदर' मध्ये सलमान खान, रश्मिका मंदान्नासोबत काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

सलमान खान काय म्हणाला?

'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी सलमान खानने 'सिकंदर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार, याचा अंदाज सांगितला आहे. जेव्हा सलमानला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, "चित्रपट कसा ही असो, चांगला किंवा वाईट...पण माझ्या चाहत्यांनी यापूर्वी कायम चित्रपटाचा 100 कोटींचा टप्पा पार करायला मदत केली आहे. मग आता तर 'सिकंदर' 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे."

सलमान खानच्या बोलण्यातून त्याने चाहत्यांवर खूप विश्वास दाखवला आहे. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमी त्याला पाठिंबा देताना पाहायला मिळतो. 'सिकंदर' आता बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सलमान खानच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'सिकंदर' 30 मार्चला गुढीपाडव्याला रिलीज होणार आहे. तर सोमवारी 31 मार्चला ईद साजरी केली जाणार आहे.

Salman Khan
Akshaye Khanna : "औरंगजेब हा...",'छावा'ची ऑफर स्वीकारण्यापूर्वी अक्षय खन्नानं व्यक्त केली होती इच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com