Salman Khan : "रश्मिकाच्या वडिलांना काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला काय?", सलमान खाननं ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Salman Khan-Rashmika Mandanna Age Gap : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने 'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान त्याच्या आणि रश्मिका मंदान्नाच्या वयातील अंतरावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
Salman Khan-Rashmika Mandanna Age Gap
Salman KhanSAAM TV
Published On

सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) चित्रपटाचा काल (23 मार्च) ला ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी हजेरी लावली होती. साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पहिल्यांदा भाईजान सलमान खानसोबत काम करत आहे. 'सिकंदर'चा ट्रेलर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच आतुर झाले आहेत.

'सिकंदर' चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरमधून सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एकीकडे त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे सलमान आणि रश्मिका यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

सलमान खान 59 वर्षांचा आहे. तर रश्मिका मंदान्ना 28 वर्षांची आहे. दोघांच्या वयात जवळपास 31 वर्षांचे अंतर आहे. या संदर्भात सलमान खान ट्रेलर लाँच वेळी म्हणाला की, "हिरोईन आणि माझ्या वयात 31 वर्षांचा फरक आहे. पण जेव्हा हिरोईनला काही प्रॉब्लेम नसतो हिरोईनच्या वडिलांना काही त्रास नसतो. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा तिचे लग्न होईल आणि तिला मुलं होतील तेव्हा त्यांच्यासोबतही काम करणार. आईची परवानगी मिळेलच."

'सिकंदर' चित्रपटामध्ये सलमान, रश्मिकासोबतच काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'सिकंदर' 30 मार्चला गुढीपाडव्याला रिलीज होणार आहे. तर सोमवारी 31 मार्चला ईद साजरी केली जाणार आहे.'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास यांनी केले आहे. चित्रपटात सलमान खानचा ॲक्शन मोड पाहायला मिळत आहे.

Salman Khan-Rashmika Mandanna Age Gap
Akshaye Khanna : "औरंगजेब हा...",'छावा'ची ऑफर स्वीकारण्यापूर्वी अक्षय खन्नानं व्यक्त केली होती इच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com