Laughter Chefs 2 : बॉलिवूडच्या 'खान'ला 'लाफ्टर शेफ'ची ऑफर, आमिर-सलमान की शाहरुख कोण आहे तो?

Amir Salman Shahrukh : 'लाफ्टर शेफ 2' सध्या चांगलेच चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार एन्ट्री घेणार आहे. हा सुपरस्टार बॉलिवूडच्या तीन खान पैकी एक असणार आहे. त्यामुळे चाहते शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
Amir Salman Shahrukh
Laughter Chefs 2SAAM TV
Published On

सध्या 'लाफ्टर शेफ' (Laughter Chefs 2) हा शो चांगलाच चर्चेत आहे. हा एक रिअ‍ॅलिटी कुकिंग शो आहे. या शोमध्ये कलाकार चमचमीत पदार्थ बनवताना पाहायला मिळतात. हा शो मनोरंजनाचे आणि हास्याचे पावर हाऊस आहे. आता या शोमध्ये चक्क बॉलिवूडच्या मोठ्या स्टारची एन्ट्री होणार आहे. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. हा सुपरस्टार बॉलिवूडच्या तीन खानपैकी एक आहे.

बॉलिवूडचे तिन्ही खान (Amir Salman Shahrukh ) कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असतात. 'लाफ्टर शेफ'च्या शोवर दुसर-तिसर कोणी नाही, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान येणार आहे. अभिनेता सलमान खानला शोवर येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच लवकरच सलमानचा आगामी चित्रपट 'सिकंदर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान 'लाफ्टर शेफ' शो मध्ये 'सिकंदर' च्या प्रमोशनसाठी येणार आहे. तो पाहुणा कलाकार म्हणून येणार आहे. 'सिकंदर' 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आल्यावर 'लाफ्टर शेफ' शोमध्ये विनोदाचा तडका वाढणार आहे.

सलमान खान शोमध्ये कोणता धुमाकूळ घालतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. चाहते सलमान खानच्या एपिसोडसाठी खूप उत्सुक आहेत. 'लाफ्टर शेफ'मध्ये अनेक तगडे सेलिब्रिटी दिसत आहे. नुकताच शोमध्ये करण कुंद्रा देखील आलेला पाहायला मिळत आहे.

'लाफ्टर शेफ' शो मध्ये कॉमेडीचा तडका देण्यासाठी कॉमेडी क्वीन भारती सिंह पाहायला मिळत आहे. तसेच शोमध्ये करण आणि भारती कॉमेडीचा धुमाकूळ घालणार आहे.

Amir Salman Shahrukh
Ira Khan : बापाला भेटून लेक रडत निघाली, आयरा अन् आमिर खानचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com