सलमान खान ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र ! पहा व्हायरल Photo
salman khan and aishwarya raisaam Tv

AI Photo : सलमान खान ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र ! पहा व्हायरल Photo

AI Photo : सोशल मिडीयावर दररोज विविध व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मिडीयावर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Published on

AI Photo : बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची चर्चा आज देखील रंगलेली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्यच्या घटस्फोटाच्या अफवांनंतर सोशल मीडियावर पुन्हा सलमान आणि ऐश्वर्याच्या चर्चाना उधाण आला आहे. अशातच या दोघांचा एआय केले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहेत.

एकेकाळी बॉलीवूडचे सर्वाधिक चर्चेत असलेले कपल मानले जाणारे सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा प्रवास भलेही खूप आधी संपला असेल, पण त्यांच्या जोडीच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. AI च्या मदतीने त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहणे ही चाहत्यांना आणि नेटिझन्ससाठी सुखद अनुभव आहे. कलाकार साहिद एसके यांनी एआय आणि फोटोशॉपच्या मदतीने ही छायाचित्रे तयार केली आहेत, जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सलमान खान ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र ! पहा व्हायरल Photo
Varun Dhawan : तुम्ही या देशाचे हनुमान... ; वरुण धवनच्या प्रश्नावर अमित शहांचं भन्नाट उत्तर

AI ने तयार केलेल्या या चित्रांमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहेत. ही छायाचित्रे पाहता हे दोघेही जणू पॅरेलर युनिव्हर्समध्ये मुंबईच्या गल्लीबोळात खरेदी करताना आणि फिरताना दिसत आहेत. दोघांनीही या चित्रपट मॅचिंग आउटफिट घातले आहेत, ज्यामुळे हे चित्र बघायला आणखीनच रंजक वाटत आहेत.

सलमान खान ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र ! पहा व्हायरल Photo
Mukesh Khanna : मुकेश खन्नाने 'शक्तिमान'चे हक्क देण्यास दिला नकार ; म्हणाले 'तुम्हाला बनवायचे असेल तर...'

सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सलमान खानचे किक २ आणि आदित्य चोप्राचा बहुप्रतिक्षित टायगर विरुद्ध पठाण हे चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन २' मध्ये दिसली होती. नंदिनी आणि मंदाकिनी देवी या तिच्या दुहेरी भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com