

Ibrahim Ali Khan Bollywood Debut: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान नेहमी कॅमेरामध्ये स्पॉट होत असतो. इब्राहिम बऱ्याचदा त्याची बहीण सारा अली खानसोबत किंवा बॉलिवूड पार्टीमध्ये दिसतो. इब्राहिम कॅमेराच्या मागे खूप सक्रिय आहे. परंतु लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. करण जोहर इब्राहिमला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट 2023 मध्ये येऊ शकतो. इब्राहिम अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी करणार आहे. या चित्रपटाची कथा डिफेन्स फोर्सवर आधारित असून करण जोहर याची निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हा चित्रपट बिग बजेटचा असेल आणि इब्राहिमची व्यक्तिरेखाही खास असेल असे सांगण्यात येत आहे.
इब्राहिम अली खानने अद्याप मोठ्या पडद्यावर पदार्पण केले नसले तरी, तो बऱ्याच काळापासून पडद्यामागे काम करत आहे. इब्राहिम अली खानने करण जोहरला त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात असिस्ट केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. (Bollywood)
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांना इब्राहिम अली खान आणि सारा अली खान ही दोन मुले आहेत. सारा आणि इब्राहिम हे वडील सैफसोबत अनेकदा दिसले आहेत आणि त्यांच्यात चांगली बाँडिंग आहे. साराने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Celebrity)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.