
Karan Johar And Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेता करण जोहर खोचक पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी खूप चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांमुळे आणि रिॲलिटी शोमुळे तो बराच चर्चेत असतो. अनेकदा करण त्याच्या चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चित्रपटातून अनेकदा स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते.
काही चित्रपटांतून त्याला नव्या स्टारकिड्सचा फायदा होतो, तर काहींचा म्हणावा इतका फायदा होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्याला प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. करणने प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट दिले. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'स्टुडंट ऑफ द इयर'
सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन आणि आलिया भट्ट यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. तसेच अनन्या पांडेला 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आणले.
यांचा सर्वांचा चाहता वर्ग बराच मोठा आहे, सोशल मीडियावर हे सर्वच कलाकार चांगलेच सक्रिय असतात. लवकरच करण जोहर प्रेक्षकांच्या भेटीला नवा चित्रपट आणणार आहे. त्या चित्रपटाचे नाव 'स्टुडंट ऑफ द इयर ३' आहे.करणने चित्रपटाची घोषणा आणि चित्रपटात कोण कोण कलाकार मुख्य भूमिकेत आहे, ते सुद्धा सांगितले आहे.
करणने नुकताच एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे, हा विकी कौशलचा एक मजेदार व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये करण पहिल्यांदा विकीच्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे. करणने विकीला त्याच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाबद्दल विचारले आहे. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात करण विकीला ऑफर देताना दिसत आहे.
करणने त्या व्हिडिओमध्ये सांगितले की, तो 'स्टुडंट ऑफ द इयर-3' बनवणार आहे. यासोबत त्याने या चित्रपटातील अभिनेत्याचं नाव सुद्धा जाहीर केले आहे. या व्हिडिओत करणने राष्ट्रीय पुरस्कार विजेता विकी कौशलचे नाव घेतले आहे.
करण-विकीची ही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहे. आता करणला विकीसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 3' करायचा आहे का की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
या व्हिडीओत विकी करणला म्हणतो, “मला खरोखरच तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मला धर्मा प्रोडक्शन्स बरोबर काम करायचं आहे.” त्यावर करण म्हणतो, “पण मी दिलेल्या ऑफरला तू काही ना काही कारणं देत टाळत आहे.”
त्यावर विकीने सांगितले, “तुझ्याकडे आणखी एखादी चांगली स्क्रिप्ट असेल तर सांग मी करेन काम.” त्यावर करणने उत्तर दिले, “माझ्याकडे एक खूप चांगली स्क्रिप्ट आहे. एक अतिशय मोठा प्रोजेक्ट करायचा माझ्या विचार आहे.” करणचं हे बोलणं ऐकून विकी खूप उत्सुक आणि आनंदी झाला.
करणने विकीचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, “मला जाणवतंय की तुझे दोन्ही हात थरथरत आहेत.” यावर विकीही होकार देतो. त्यावर करण म्हणतो, “मी जो ग्रँड प्रोजेक्ट करणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे – ‘स्टुडंट ऑफ द इअर ३.”
करणचं हे बोलणं ऐकून विकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो आणि तो दुःखी होतो पण करणला न दाखवता कॅमेऱ्यात बघून त्याचं म्हणणं हावभावाने मांडतो. करण आणि विकीचं हे संभाषण मजा मस्करीत सुरू होतं. पण आगामी काळात खरोखरच तो ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’मध्ये दिसणार का हे लवकरच कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.