'हर हर महादेव' चित्रपटाला विरोध नाही, पण...'; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी 'या' दृश्यावर घेतला आक्षेप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
Har Har Mahadev movie Controversy
Har Har Mahadev movie ControversySaam Tv
Published On

Har Har Mahadev Controversy: हर हर महादेव चित्रपटावरून अनेक वाद होत आहेत. या चित्रपटावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु हर हर महादेव चित्रपटावरून होत असलेले वाद अद्याप थांबलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजानंतर आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर हर हर महादेव चित्रपटावर अनेकांनी टिका केली. या चित्रपटाविरुद्ध महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडल्या. आंदोलने झाली, चित्रपटाचे पोस्टर उतरवण्यात आले, शो बंद करण्यात आले, प्रेक्षकांना मारहाण केली गेली. या चित्रपटावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण बरेच तापले होते. महाराष्ट्रातील हे वातावरण शांत होत असतानाच बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आता यावर आक्षेप घेतला आहे.

Har Har Mahadev movie Controversy
'हेरा फेरी 3'मध्ये अक्षय कुमारची होणार एन्ट्री, सुनील शेट्टीने केला खुलासा

बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी का घेतला आक्षेप ?

ऐतिहासिक गोष्टी बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही. चित्रपटातील अनेक दृश्य इतिहासाला धरून आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शिवा काशीदला डुप्लिकेट दाखवून संपवले आहे. बाजूप्रभु देशपांडे आणि देशमुख यांच्यातील वादाचे वेगळेच कारण दाखवले आहे. या वादाचे ऐतिहासिक पुरावे नसल्याचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी म्हटले आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी किंवा अरे तुरे असा उल्लेख दाखवला आहे, हे चुकीच आहे.

आम्हाला सिनेमा दाखवावा एवढीच अपेक्षा होती, असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी म्हटले आहे. निर्माते संपर्क साधतील, पण कोणीही संपर्क साधला नाही. हर हर महादेव चित्रपटाला विरोध नाही पण काही दृशांना विरोध आहे, असेही बाजीप्रभू देशपांडे यांनी सांगितले. (Movie)

मावळ प्रांतात समुद्र दाखविण्यात आला आहे. इंग्रज या प्रांतातील स्त्रियांना पळवून नेत आहेत असेही दाखविण्यात आले आहे. तसेच फुलाजी देशपांडे आणि बाजीप्रभू यांच्यामध्ये लहानपणी वाद दाखविण्यात आला आहे. त्यामुळे यातून फुलाजी यांची बदनामी होत आहे. आम्ही निर्मात्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. बोलून प्रश्न सुटतात का याची आम्ही वाट होतो. आता कायदेशीर अर्ज करणार आहोत, असेही बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी सांगितले आहे.

हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या मारहाणीवर निषेध व्यक्त करण्यासाठी दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी घेतलेल्या आक्षेपावर कोण समोर येऊन स्पष्टीकरण देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com