Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राचं निधन, बिग बींनी केली भावनिक पोस्ट

नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कारण त्यांचा पाळीव कुत्र्याचे निधन झाल्याने बिग बी दु:खी झाले आहेत.
Amitabh Bachchan And Labra Dog
Amitabh Bachchan And Labra Dog Instagram/ @amitabhbachchan

Amitabh Bachchan: कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. या एका पाळीव प्राण्यासोबत राहून माणूस त्याचा एकटेपणा आणि थकवा विसरुन जातो. बिग बि अमिताभ बच्चन यांनाही असेच काहीसे वाटते. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कारण त्यांचा पाळीव कुत्र्याचे निधन झाल्याने बिग बी दु:खी झाले आहेत.

Amitabh Bachchan And Labra Dog
Amitabh Bachchan: बिग बींचे चित्रपटही असतात बिग बजेट, तरीही निर्मात्यांची पहिली पसंदी अमिताभ यांनाच

सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कुत्रे पाळणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे फार आवडते. कुत्र्यांना आपल्या मुलाप्रमाणे आपल्याजवळ ठेवणे, कामावरून परतल्यावर त्यांच्यासोबत वेळ घालवणे, खेळणे आणि त्यांना खायला घालणे त्यांना आवडते. मुंबईच्या झगमगाटात हरवलेल्या तारकांना अशी जागा सापडते जिथे ते कोणत्याही मत- मतांतराशिवाय त्या खास मित्रासोबत आपले दु:ख आणि वेदना शेअर करत असतात.

Amitabh Bachchan And Labra Dog
Bigg Boss Marathi 4: अमृता देशमुखसमोर विकास मांडणार आपली बाजू, अपूर्वाबद्दल केले खळबळजनक विधान

अमिताभ बच्चन यांनाही हेच दुःख सध्या जाणवत आहे. वर्षानुवर्षे सोबत असलेला त्यांचा 'खास मित्र' त्यांच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. माणसाचा बेस्ट फ्रेंड म्हटल्या जाणाऱ्या या जीवाच्या जाण्याने अमिताभही अस्वस्थ झाले आहेत. पोस्ट शेअर करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमिताभ यांनी कुत्र्यासोबतचा गोड फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की,"आमचा एक गोड छोटा मित्र...आमचा छोटा मित्र, हा मोठा झाला आणि आम्हाला सोडून गेला," अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan And Labra Dog
Urmila Kothare: उर्मिला सायबर क्राईमच्या जाळ्यातून थोडक्यात बचावली, अनुभव शेअर करत म्हणाली

आपला हा छोटा मित्र कधी गमावला किंवा त्याचे नाव काय हे बिग बींनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले नाही. पण त्याची किती उणीव भासत आहे, हे त्यांनी निश्चितपणे व्यक्त केले. अमिताभ बच्चन त्या छोट्या लॅब्राडोर पिल्लाकडे मोठ्या प्रेमाने बघत आहेत.

अमिताभ यांना दुःखी पाहून चाहतेही त्यांना धीर देत आहेत. या पोस्टवर 'पाळीव प्राणी खूप गोड असतात', 'पाळीव प्राणी आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात', 'पाळीव प्राणी हे मौल्यवान असतात', अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांचा 'हाईट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात अमिताभसोबत नीना गुप्ता, बोमन इराणी, अनुपम खेर, सारिका यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com