Tumbadche Manjula: रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका; उलगडणार सर्व रहस्य जेव्हा येईल 'तुंबाडची मंजुळा'

Tumbadche Manjula: झी स्टुडिओजच्या 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रहस्य, भीती, गूढता आणि विनोदाच्या भन्नाट मिश्रणामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Tumbadche Manjula
Tumbadche ManjulaSaam Tv
Published On

Tumbadche Manjula: झी स्टुडिओज प्रस्तुत ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पोस्टर, टीझर आणि गाण्यांमधून आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने आता ट्रेलरमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रहस्य, गूढता, भीती आणि त्यासोबतच खळखळून हसवणारा विनोद यांचा अनोखा संगम या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलरची सुरुवात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या दमदार निवेदनाने होते. त्यांच्या खास शैलीतील संवादांमुळे प्रेक्षक थेट त्या रहस्यमय गावात प्रवेश करतात. गावावर घोंगावणारं अदृश्य संकट, विचित्र घटना आणि अतरंगी गावकऱ्यांची धमाल या सगळ्यामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली आहे.

Tumbadche Manjula
Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई

चित्रपटात मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, ओम भूतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित आणि शार्दूल सराफ यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराचा सहजसुंदर अभिनय, भन्नाट संवाद आणि अचूक कॉमिक टायमिंग ट्रेलरमध्ये ठळकपणे जाणवतं. भयपटाची पार्श्वभूमी असतानाही चित्रपट पूर्णपणे मनोरंजनप्रधान असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

Tumbadche Manjula
Anupriya Goenka: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ; वेश्याव्यवसायाला म्हटलं 'सोशल सर्व्हिस'

मात्र ट्रेलरच्या शेवटच्या भागात एका गूढ रूपात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेते. तिच्या पात्राभोवती असलेलं रहस्य नेमकं काय आहे, हा प्रश्न ट्रेलर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरेगांवकर यांनी हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव असल्याचं सांगितलं. त्यांनी प्रत्येक पात्र आणि प्रसंग वेगळ्या शैलीत उभा करण्याचा प्रयत्न केल्याचंही स्पष्ट केलं. तर झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला. रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com