Sai Tamhankar : नऊवारी साडी अन् केसात गजरा; सईच्या ठसकेबाज लावणीची पहिली झलक, पाहा VIDEO

Sai Tamhankar Lavani Teaser : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. तिच्या लावणीची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Sai Tamhankar Lavani Teaser
Sai TamhankarSAAM TV
Published On

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचे बॅक टू बॅक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सई ताम्हणकर आता 'देवमाणूस' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात ती एका खास अंदाजात पाहायला मिळणार आहे. याची झलक सईने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दाखवली आहे. सई 'देवमाणूस'मध्ये जबरदस्त लावणी सादर करणार आहे.

पहिल्यांदाच सई ताम्हणकर लावणी सादर करताना चाहत्यांना दिसणार आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सई नऊवारी साडीमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या लावणीचा टीझर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतून सईचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी, मॅचिंग ब्लाऊज, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळला आहे. तसेच कानात मोठे झुमके आणि कंबरपट्टा घालून तिने पारंपरिक लूक केला आहे.

सई ताम्हणकरच्या लावणीच्या टीझरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "यायचा वादा होता, येत्ये ती! "आलेच मी" येत आहे उद्या आपल्या भेटीला 'देवमाणूस'" सईच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिची लावणी पाहण्यासाठी आतुर आहेत. 'देवमाणूस' (Devmanus) हा चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

25 एप्रिलला सई ताम्हणकर चक्क दोन चित्रपट रिलीज होत आहे. पहिला 'देवमाणूस' आणि दुसरा 'ग्राउंड झीरो' होय. 'ग्राउंड झीरो' (Ground Zero ) हा सईचा हिंदी चित्रपट आहे. यात ती बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने आजवर अनेक हिट हिंदी, मराठी चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत. अलिकडेच तिची 'डब्बा कार्टेल', 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिज खूप गाजल्या आहेत.

Sai Tamhankar Lavani Teaser
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी बनवला कोकणी पदार्थ; चटपटीत 'काजूच्या बोंडूचं भरीत', नोट करा पारंपरिक रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com