Sai Tamhankar: चंद्रा - फुलवंतीनंतर सई ताम्हणकरच्या ठेक्यावर नाचणार संपूर्ण महाराष्ट्र; पहिल्यांदाच सादर होणार ठसकेदार लावणी

Sai Tamhankar Lavani: ‘देवमाणूस’ या चित्रपटातून मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.
Sai Tamhankar Lavani
Sai Tamhankar LavaniSaam Tv
Published On

Sai Tamhankar Lavani: ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांमध्ये त्याची गणना करण्यात येत आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे आदी कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

नुकतीच या चित्रपटातील महत्वाची आणि थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.

Sai Tamhankar Lavani
Sonu Sood Wife Accident: 'ती वाचली हा चमत्कार...'; पत्नीच्या अपघातामुळे भावुक झाला सोनू सूद म्हणाला, देवाचे आभार

हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर चंदेरी पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

Sai Tamhankar Lavani
Viral Video: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची रिप्लेसमेंट केली कुत्र्याने; स्वतःच धक्कादायक खुलासा करत म्हणाली, 'माझा चेहरा...'

याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”

‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे तर, लव रंजन व अंकुर गर्ग या चित्रपटाचे निर्मिते आहेत. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com