Sachin Pilgaonkar Video : "मी 9 वर्षांचा होतो तेव्हा पहिली गाडी घेतली..."; महागुरु सचिन पिळगावकरांचा आणखी एक दावा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Sachin Pilgaonkar Viral Video : मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्यांनी ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचे म्हटले आहे.
Sachin Pilgaonkar Viral Video
Sachin Pilgaonkar SAAM TV
Published On
Summary

महागुरु सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन पिळगावकर यांनी ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचे म्हटले आहे.

सचिन पिळगावकर यांचा किस्सा ऐकून लेकीलाही धक्का बसला आहे.

महागुरु सचिन पिळगावकर कायम आपल्या वक्त्यामुळे चर्चेत असतात. त्याचे व्हिडीओ कायम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्यांनी आजवर मराठी, हिंदी चित्रपटांत काम केले आहे. नाटक आणि वेब सीरिजमध्ये देखील झळकले आहेत. त्यांनी आजवर अनेक मोठ्या मराठी, हिंदी कलाकारांबद्दल विधाने केली आहेत. जी चांगलीच चर्चेत आहेत. आता देखील त्यांचा असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी 9 व्या वर्षी गाडी घेतल्याचा दावा केली आहे.

व्हिडीओमध्ये पाहून शकता की, एका गाडीत मुलाखतकार, सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर बसलेले असतात. तेव्हा सचिन पिळगावकर त्यांना एक किस्सा सांगतात. सचिन पिळगावकर म्हणतात की, "मी 9 वर्षांचा होतो, त्यावेळी हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी (दादर) येथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क येथे येते. मी 9 वर्षांचा होतो तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. तिल मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती. तेव्हा ड्रायव्हर होता. मी 9 वर्षांचा असताना, वरळी सीफेसवर त्याच गाडीमधून गाडी चालवायला शिकलो."

आपल्या वडीलांनी 9 व्या वर्षी गाडी घेतल्याचे ऐकताच श्रिया पिळगावकरला ही मोठा धक्का बसतो. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. व्हिडीओत सांगितलेली गोष्ट काल्पनिक असल्याचे बोले जात आहे. श्रिया देखील हे ऐकत हसताना दिसत आहे. तर मुलाखतकार याबद्दल आणखी प्रश्न सचिन पिळगावकर यांना विचारत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल होत आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

व्हिडीओवर एका युजरने लिहिलं की, "मी 9 वर्षाचा होतो. तेव्हा पप्पांनी सायकल पण दिली नव्हती." तर दुसरा युजर बोलतो की, "सकाळी सकाळी हे बघून खूप हसलो राव. मेट्रोमध्ये शेजारी बसलेला तरुणसुद्धा खूप हसत होता. गाडी पेट्रोल डालने वाली...लेक सुद्धा वैतागली असेल असल्या महागुरुला..." तर अजून एका युजरने लिहिलं की, "महागुरू बरोबर सांगत आहेत की, त्यांनी ९ व्या वर्षी पहिल्यांदा गाडी चालवली, पण ती गाडी ही लहान मुलांच्या खेळण्यातील होती..." अशा भन्नाट कमेंट येत आहेत. नेटकरी सचिन पिळगावकर यांची खिल्ली उडवत आहेत.

Sachin Pilgaonkar Viral Video
Jahnavi Killekar : सूरज चव्हणच्या लग्नानंतर बहिणीची तब्येत बिघडली; जान्हवी किल्लेकरनं रुग्णालयातून शेअर केला फोटो, नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com