OTT Watch List: 'या' वेबसीरीज पाहत सेलिब्रेट करा तुमच्या जोडीदारासोबत Valentine's Day...

तुम्ही रोमँटिक वेब सिरीज पाहून व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.
Web Series Based On Love
Web Series Based On Love Saam TV

Valentines Day Special Love Stories On OTT: सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे बाहेत आहेत. आज १४ फेब्रुवारी आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून जोडपे वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करत असतात. आपल्या खास व्यक्तीला मनातील भावना सांगायला, त्याला किंवा तिला खुश करायला वेगवेगळ्या गोष्टी लोक प्लॅन करत असतात. पण जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला बिंज वॉच करायला आवडत असेल OTT तुम्ही काय प्लॅन कराल. तर तुम्ही रोमँटिक वेब सिरीज पाहून व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.

OTTवर सर्वात जास्त लोक गुन्हेगारीवर आधारित वेबसीरीज पाहणे पसंत करतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर प्रेम आणि रोमान्स पाहायला लोकांना आवडते. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू

Web Series Based On Love
Shahrukh Khan Movie: 'पठान'ला मिळणार 'पुष्पा'ची साथ; शाहरुखच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार साऊथचा सुपरस्टार

ओटीटीवर अनेक रोमँटिक वेबसीरीज उपलब्ध आहेत. या वेबसीरीजमध्ये प्रेमकथा अतिशय रंजक पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसीरीजमध्ये आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या अनेक युगुलांची कथा दाखवण्यात आली आहे.

या रोमँटिक वेबसीरीजमध्ये तुम्हाला प्रेमाच्या वेगवेगळ्या शैली पाहायला मिळतील. प्रेमात बुडालेली प्रेयसी, तर आपल्या प्रेमासाठी काहीही करणारी प्रियकर यांच्यावर आधारित या वेबसीरीजविषयी जाणून घेऊया या...आणि इतर अनेक भाषांमध्ये या वेबसीरीज ओटीटीवर उपलब्ध आहेत.

YOU Season 4 Part-1 

या नेटफ्लिक्स सीरीजच्या चौथ्या सीझनचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. जर तुम्हाला इंग्रजी पाहण्याची आवड असेल तर तुम्हाला ही वेबसीरीज नक्कीच आवडेल. 'यू' ही रोमँटिक थ्रिलर वेबसीरीज आहे, ज्याच्या चौथ्या सीझनचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर आला आहे. दुसरीकडे, मालिकेचा दुसरा भाग मार्चमध्ये येईल, असे या वेबसीरीजच्या पोस्टरमध्ये सांगण्यात आले आहे. 'यू'चा हा शेवटचा सीझन आहे.

Yeh Kaali Kaali Ankhein

व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले नाहीत असे कसे होईल. नेटफ्लिक्सची ही वेबसीरीज तुमचा व्हॅलेंटाइन डे आणखी खास बनवेल. 'ये काली काली आंखे' ही एकतर्फी प्रेमाची कथा आहे, तर प्रेमासाठी मरणारे निष्पाप प्रेमही आहे. या वेबसीरीजमध्ये ताहिर राज भसीन, आंचल सिंग आणि श्वेता त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Jehanabad - Of Love & War

तुम्हीही तुमच्या खास व्यक्तीसाठी डेट प्लॅन करत असाल तर सोनी LIV ची ही मालिका नक्की पहा. प्रेम आणि कर्तव्यावर आधारित ही मालिका खूपच रोमांचक आहे. या मालिकेत प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. एकीकडे आपल्या प्रेयसीवर अमर्याद प्रेम करणारा प्रियकर आहे, तर दुसरीकडे फसवणूक आणि त्याग आहे. या मालिकेत ऋत्विक भौमिक आणि हर्षिता गौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Flames Season 3

प्रेम म्हटलं की सर्वांचं कॉलेजचे दिवस आठवतात. प्राइम व्हिडिओच्या या शोमध्ये एक गोड प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या वेबसीरीजचे तीन सीझन आले आहेत, ज्यामध्ये तान्या माणिकतला आणि ऋत्विक साहोरे मुख्य भूमिकेत आहेत.

Indori Ishq

एमएक्स प्लेअरच्या या वेबसीरीजमध्ये प्रेमात अखंड बुडलेल्या प्रियकराची कथा सांगण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीवर मनापासून प्रेम करणारा हा प्रियकर प्रेमाच्या सर्व मर्यादा कशा ओलांडतो. या वेबसीरीजची कथा तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल. या मालिकेत ऋत्विक साहोरे आणि वेदिका भंडारी मुख्य भूमिकेत आहेत.

Broken But Beautiful... Season 3:

ब्रोकन बट ब्युटीफुल ही वेबसीरीज तुमचा व्हॅलेंटाईन डे आणखी खास बनवेल. ही मालिका तुम्ही Alt Balaji, MX Player आणि G5 वर पाहू शकता. या वेबसीरीजचे तीन सीझन आले आहेत. प्रेमात कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याची धमक असते असे वेबसीरीजमधील कथेत दाखवण्यात आहे. वेबसीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये विक्रांत मॅसी आणि हरलीन सेठी मुख्य भूमिकेत होते. तर तिसऱ्या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी मुख्य भूमिकेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com