Shahrukh Khan Upcoming Movie: 'पठान'ला मिळणार 'पुष्पा'ची साथ; शाहरुखच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार साऊथचा सुपरस्टार

Allu Arjun Bollywood Debut : शाहरुखच्या चित्रपटामध्ये साऊथ स्टार दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे.
Pathaan Movie SRK Look
Pathaan Movie SRK Look Saam Tv

Allu Arjun's Cameo In Shah Rukh Khan Movie: शाहरुख खानचा 'पठान'(Pathaan) चित्रपट बॉक्स ऑफिसवर जामदार कलेक्शन करत आहे. हा चित्रपट लवकरच भारतात ५०० कोटी तर जगभरात १००० कोटींचा टप्पा पार करणार आहे. शाहरुखचा आगामी चित्रपट 'जवान'(Jawan) देखील जूनमध्ये प्रेक्षजकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शाहरुखच्या चित्रपटामध्ये साऊथ स्टार दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Pathaan Movie SRK Look
Khelo India Youth Games: आर माधवनच्या मुलाची सोनेरी कामगिरी; वेदांतच्या कौतुकाचा सोशल मीडियावर डंका

'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली करत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी मोठं मोठ्या कलाकारांना या चित्रपटामध्ये स्थान दिले आहे. यात नयनतारा आणि विजय सेतुपाति ही प्रमुख नवे आहेत, जे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत.

सिनेमा विश्वात अशीही बातमी आहे की थलपथी विजय जवानमध्ये एक रोमांचक कॅमिओ करणार आहेत. अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा' चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनही शाहरुख खानच्या जवानमध्ये दिसणार आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. जर हे खरं असेल तर अल्लू अर्जुनचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट असेल.

चित्रपटात खास कॅमिओसाठी अॅटलीने अल्लू अर्जुनशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. जर ही बातमी खरी असेल तर शाहरुख आणि अल्लू अर्जुनची जोडी मोठ्या पडद्यावर धमाल करेल यात शंका नाही.

Peepingmoon.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनने जवानमध्ये भूमिका साकारण्यासाठी अद्याप होकार दिलेला नाही. अल्लू या चित्रपटात भूमिका साकारण्यास तयार होण्याची शक्यता आहे. अल्लूला ऑफर केलेले पात्र चित्रपटाच्या कथेशी जोडते, असेही अहवालात लिहिले आहे.

'जवान'मध्ये 'पुष्पा' स्टार दिसला, तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटही तुफान कलेक्शन करेल. जून महिना म्हणजे सुट्टीचा महिना असतो. यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com