Alia Bhatt Company : मुकेश अंबानी विकत घेणार आलिया भट्टची कंपनी; 'डील'चा आकडा पाहून डोळे होतील पांढरे

Reliance Buying Alia Clothing Brand : रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड आणि एड-ए-मम्मा यांच्यातील करारावर येत्या सात ते 10 दिवसांत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
Alia Bhatt’s Clothing Brand Acquired By Mukesh Ambani
Alia Bhatt’s Clothing Brand Acquired By Mukesh AmbaniInstagram/@aliaabhatt

Alia Bhatt’s Clothing Brand Acquired By Mukesh Ambani : रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड या रिलायन्सचा एक भाग असलेल्या कपंनीने अभिनेत्री आलिया भटचा किड्सवेअर ब्रँड एड-ए-मम्मा सुमारे ₹300-350 कोटींमध्ये विकत घेणार असल्याची चर्चा आहे. रिलायन्स ब्रँड आणि एड-ए-मम्मा यांच्यातील डील अंतिम टप्प्यात आहे आणि नवीन अहवालानुसार येत्या काही दिवसांत करार होण्याची शक्यता आहे.

एड-ए-मम्मा बद्दल

एड-ए-मम्मा ब्रँड इटर्नलिया क्रिएटिव्ह आणि मर्चेंडाइजिंगच्या मालकीचा आहे, ज्याची आलिया भट एक डायरेक्टर आहे. एड-ए-मम्मा कंपनी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. लहान मुलांचे कपडे परवडणाऱ्या दरात देणारी ही कंपनी आहे.

हा किड्सवेअर ब्रँड प्रामुख्याने ऑनलाइन चालतो परंतु काही मोठ्या रिटेल चैनमध्ये देखील विकला जातो. गेल्या वर्षी, या ब्रँडने प्रेगन्सीमध्ये घालायच्या कपड्यांचा देखील समावेश केला आहे. (Latest Entertainment News)

Alia Bhatt’s Clothing Brand Acquired By Mukesh Ambani
HBD Bhumi Pednekar : बिनधास्त भूमी पेडणेकरच्या खऱ्या आयुष्यतील काही Unknown Stories, जाणून घ्या

आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहा कपूर या पहिल्या मुलाला जन्म दिला. प्रेगन्सी दरम्यान तिला आलेल्या कपड्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तिने गरोदर महिलांसाठी कपड्यांचा ब्रँड सुरू केला.

इकॉनॉमिक टाईम्सने या प्रकरणाची माहिती असलेल्या उद्योग अधिकार्‍यांचा हवाला देऊन अहवाल दिला आहे की, रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड आणि एड-ए-मम्मा यांच्यातील करारावर येत्या सात ते 10 दिवसांत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या करारामुळे रिलायन्सला किड्सवेअर मार्केटमध्ये अधिक फायदा होईल, असे कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अहवालानुसार, हा करार अंदाजे ₹300-350 कोटींचा आहे.

पुढील 2-3 वर्षांच्या एड-ए-मम्मासाठीच्या योजनांवर भाष्य करताना आलियाने गेल्या वर्षी पीटीआय या नवीन एजन्सीविषयी सांगितले होते, “मला लहान मुलांच्या विभागात आणखी विस्तार करायचा आहे. मला फॅमिली केअर विभागात अजून नवनवीन गोष्टी वाढवायच्या आहेत."

रिलायन्स ब्रँड्सबद्दल

2007 मध्ये स्थापित, रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडने 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह सहयोग केले आहे आणि भारतात 2,000 हून अधिक स्टोअर्स चालवत आहेत. लक्झरीमधील अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि अरमानी एक्सचेंज, बर्बेरी, बॅली, बोटेगा वेनेटा, कॅनाली, डिझेल, ड्युन, हॅम्लेज, एम्पोरियो अरमानी, फेरागामो, जीएएस, ज्योर्जियो अरमानी, जिमी चू, केट स्पेड, मार्क्स आणि स्पेन्सर आणि मायकेल कॉर्स, इतर यांसारख्या इतर विभागांसह त्याची भागीदारी आहे.

आलिया भट्टचे आगामी प्रोजेक्ट्स

आलिया तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती तिच्या गली बॉय सहकलाकार रणवीर सिंगसोबत करण जोहरच्या दिग्दर्शनात काम करणार आहे, हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तसेच, आलिया लवकरच हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्यात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन तिच्या सह-कलाकार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com