Rashmika Mandanna : "छोटा विरोश येतोय..."; महिन्याभरातच रश्मिका-विजयने दिली गुडन्यूज, 'त्या' VIDEO नं रंगली चर्चा

Rashmika Mandanna Pregnant? : साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Rashmika Mandanna Pregnant?
Rashmika Mandannasaam tv
Published On
Summary

रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले.

रश्मिका- विजयने लग्नानंतर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

रश्मिका मंदाना प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

साऊथ कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. 'विरोश' च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडाच्या लग्नाला जवळपास दीड महिना झाला आहे. अशात या क्यूट कपलने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

रश्मिका मंदानाची पोस्ट

रश्मिका मंदानाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा एक ग्राफिक व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये विजय आणि रश्मिकासारखे दिसणारे हलणारे ग्राफिक्स दिसत आहेत. त्यांच्याजवळ एक सुंदर पिवळे फूलही दिसत आहे. एक हलणारा लाल हार्ट इमोजीसुद्धा दिसत आहे. हे पिवळे फूल कधी रश्मिकाला स्वतःकडे ओढत आहे, तर कधी तिच्या गालावर किस करत आहे. रश्मिकाने या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "आता आम्ही तिघे झालो..."

रश्मिका मंदानाच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा पाहायला मिळत आहे की, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच आई-बाबा होणार आहे. रश्मिकाच्या प्रेग्नन्सीचे अंदाज लावले जात आहे. मात्र अद्याप रश्मिका-विजयने कोणतही अधिकृत घोषणा केली नाही. तर दुसरीकडे चाहते बोलत आहे की, हे नवीन प्रोजेक्ट संबंधित आहे. रश्मिका मंदानाच्या व्हिडीओवर एका युजरने कमेंट केली की, "रश्मिका गरोदर आहे का?" दुसऱ्या युझरने लिहिले, "रश्मिका प्रेग्नंट आहे का?" आणखी एका युझरने लिहिले की, "ज्युनियर विरोश येतोय..." सर्वत्र अशाच कमेंट्स पाहायला मिळत आहे.

आगामी चित्रपट

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 'रणबाली' (Ranabaali) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लग्नानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले होते.

Rashmika Mandanna Pregnant?
Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com