Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांवर नाराज, भावनिक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

रश्मिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने नाराज असल्याचे सांगितले आहे.
rashmika mandanna news
rashmika mandanna newsRasmika Mandanna/@rashmika_mandanna)
Published On

Rashmika Mandanna’s Post For Trolls: रश्मिका मंदाना हिला प्रेमाने नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हटले जाते. तिला तिच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून तिरस्कार सहन करावा लागत आहे. नुकताच रश्मिकाने इंस्टाग्रामवर खूप मोठे कॅप्शन लिहून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ट्रोल होणे किती हृदयद्रावक आणि निराशाजनक असते हे सांगितले आहे. नकारात्मकता पसरवणाऱ्या अनेक ट्रोलसाठी ती एक पंचिंग बॅग असल्याचेही तिने म्हटले आहे.

rashmika mandanna news
Leslie Phillips: हॅरी पॉटरमधील 'सॉर्टींग हॅट'चा आवाज हरपला, स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन

रश्मिका मंदाना तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हणाली आहे?

गेल्या काही दिवसांपासून किंवा आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून किंवा कदाचित आता काही वर्षांपासून मला काही गोष्टी त्रास देत आहेत आणि मला वाटते की मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. मी फक्त माझ्यासाठी बोलत आहे - मी काही वर्षांपूर्वी हे करायला हवे होते.

मी माझ्या करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. बर्‍याच ट्रोलर्सनी आणि नकारात्मकतेमुळे अक्षरशः एक पंचिंग बॅग, असे मला वाटत आहे.

मला माहित आहे की मी निवडलेल्या जीवनाची ही किंमत आहे- मला समजले आहे की सगळ्यांची आवडती बानू शकत नाही आणि निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी आवडत नाही म्हणून तुम्ही त्याऐवजी नकारात्मकता पसरवाल.

तुम्हाला आनंद देण्यासाठी मी दिवसेंदिवस किती परिश्रम घेत आहे याची कल्पना तुम्हाला नाही. मी केलेल्या कामातून तुम्हाला जो आनंद वाटतो तो मला सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. ज्या गोष्टींचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटतो त्या गोष्टी मांडण्याचा मी खरोखरच प्रयत्न करत असते.

जेव्हा सोशल मीडियावर माझी थट्टा केली जाते आणि विशेषतः मी न सांगितलेल्या गोष्टींसाठी माझी थट्टा केली जाते, तेव्हा माझे हृदय पिळवटून जाते आणि मी खूप निराश होते.

मला असे कळले आहे की मी मुलाखतींमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी माझ्या विरोधात वापरल्या जात आहेत. खोट्या गोष्टी इंटरनेटवर पसरवल्या जात आहेत ज्या माझ्यासाठी आणि माझ्याशी संबंधित किंवा इंडस्ट्री बाहेरील लोकांसाठी खूप हानिकारक असू शकतात.

मी कॉन्स्ट्रक्टिव्ह टीकेचे स्वागत करते, कारण त्यामुळे मला सुधारण्यासाठी आणि अधिक चांगले काम करण्यासाठी संधी मिळते. पण वाईट नकारात्मकता आणि द्वेषाचे काय?

बऱ्याच काळापासून मला त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले गेले आहे. पण त्यामुळे ते आणखीच बिघडले आहे. हे सगळे कोणाला जिकंण्याचा प्रयत्न करीत नाही.

मला सतत मिळत असलेल्या या द्वेषामुळे मला बंदिस्त करायचे नाही आणि माणूस म्हणून बदलण्याची सक्ती करायची नाही. असे म्हटले जात आहे की, मी इतर चाहत्यांकडून मिळत असलेले प्रेम जाणते आणि त्याचा स्वीकार करतो. तुमच्या सततच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच मला पुढे येण्याची आणि हे सांगण्याची हिंमत दिली आहे.

माझे फक्त माझ्या सभोवतालच्या प्रत्येकावर प्रेम आहे, मी आतापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे, ज्यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मी कठोर परिश्रम करत राहीन आणि तुमच्यासाठी अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन.

सर्वांशी प्रेमाने. आपण सर्वजण आपापले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.

धन्यवाद. (Social Media)

रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्यासह गुडबायमध्ये दिसली होती. अभिनेत्री सध्या थलपथी विजयच्या 'वारिसू' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिचा मिशन मजनू हा हिंदी चित्रपट चित्रपटगृहात येण्याची सज्ज आहे. अभिनेत्री अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चे शूटिंग काही आठवड्यांत सुरू करणार आहे. तसेच ती रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट दिसणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com