Leslie Phillips Death: हॅरी पॉटरच्या फॅन्ससाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॅरी पॉटर चित्रपटामध्ये महत्वाचे पात्र साकारणारे ब्रिटिश अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाले आहे. लेस्ली फिलिप्स हे ९८ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराची होते.
लेस्ली फिलिप्स यांचे एजन्ट जोनाथन लॉयड यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी सांगितली आहे. जोनाथन लॉयड यांनी सांगितले की, सोमवारी रात्री झोपेतच लेस्ली यांचे निधन झाले. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनाने त्यांच्या फॅन्सला खूप दुःख झाले आहे. (Actor)
लेस्ली फिलिप्स यांचा जन्म २० एप्रिल १९२४ रोजी लंडन येथे झाला होता. त्यांनी २००हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही आणि रेडिओवर सुद्धा काम केले होते. तसेच हॅरी पॉटर टीम कडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
हॅरी पॉटर चित्रपटातील 'द सॉर्टींग हॅट'ला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. हॅरी पॉटर चित्रपटामुळे लेस्ली फिलिप्स तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले. हॅरी पॉटर चित्रपटाव्यतिरिक्त लेस्ली फिलिप्स यांनी त्यांच्या 'कॅरी ऑन' चित्रपटामुळे देखील प्रसिद्धी मिळाली. कॅरी ऑन चित्रपटातील लेस्ली फिलिप्स यांच्या फ्रेजेस लोकांना खूप आवडल्या होत्या. त्यांचे आयकॉनिक वन लायनर चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.