Rashmika Vijay Wedding: थाटात पार पडला रश्मिका आणि विजयचा शाही विवाह; उदयपूरमधील लग्नाचे पहिले फोटो समोर

Rashmika Vijay Wedding: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपूरमध्ये तेलुगू व कोडवा परंपरेनुसार भव्य विवाह सोहळा पार पडला.
Rashmika Vijay Wedding
Rashmika Vijay WeddingSaam Tv
Published On

Rashmika Vijay Wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकली आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते आणि आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनीही उदयपूर येथील आलिशानआयटीसी मूव्हमेंट्स येथे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.

सकाळी पार पडलेल्या पहिल्या विधीत पारंपरिक तेलुगू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक वेशभूषा आणि धार्मिक विधींनी हा विवाह अत्यंत भावनिक आणि मंगलमय ठरला. तेलुगू संस्कृतीनुसार होणाऱ्या विवाह विधींमध्ये पंडितांच्या उपस्थितीत विविध धार्मिक संस्कार पार पाडले जातात.

Rashmika Vijay Wedding
Mayank Pawar Death: घटस्फोटानंतर मयंक डिप्रेशनमध्ये गेला, 'या' आजाराशी झुंजत होता; आईने सांगितलं अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण

यानंतर संध्याकाळी दुसरा विवाह विधी कोडवा (कोडगु) परंपरेनुसार पार पडला आहे. कोडवा विवाह पद्धत ही कर्नाटकातील कोडगु प्रदेशाशी संबंधित असून, या विधींमध्ये पुरोहित नसतात. कुटुंबातील आणि समाजातील ज्येष्ठ मंडळीच सर्व विधी पार पाडतात, ही या परंपरेची खास ओळख आहे.

Rashmika Vijay Wedding
Actress Gold Smuggling Scandal: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची कारवाई; १०० कोटी रुपयांच्या गोल्ड स्मगलिंगचा आरोप

रश्मिका आणि विजय यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीच घर करून बसली होती. गीता गोविंदम और डियर कॉमरेड या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून आवडली होती. ऑनस्क्रीन लव्हब्रड्स आता खऱ्या आयुष्यातील जोडीदार झाले आहेत. या कपलने त्यांचे रिलेशनशिप नेहमी पॉयव्हेट ठेवले.

वयाच्या बाबतीत विजय देवरकोंडा रश्मिकापेक्षा सात वर्षांनी मोठे असून, विजयचा जन्म ९ मे १९८९ रोजी तर रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी झाला आहे. दोघांच्याही लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विवाहामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com