राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चित्रपटाची घोषणा; म्हणाली हा मूव्ही डार्क, डेडली आणि ब्रूटल...
Mardaani 3 Rani MukerjiSaam TV

Mardaani 3 : राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चित्रपटाची घोषणा; म्हणाली हा मूव्ही डार्क, डेडली आणि ब्रूटल...

Mardaani 3 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यामधील तिच्या मर्दानी या चित्रपटाचे प्रेक्षकांमध्ये विशेष कौतुक होत आहे. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे.
Published on

Mardaani 3 : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने अनेक क्लासिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ती ॲक्शन करताना दिसल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तिने मर्दानी या चित्रपटाद्वारे सर्वांना आश्चर्यचकित केले. आता या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' चित्रपटगृहात कधी दाखल होईल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. २०१४ मध्ये आलेल्या 'मर्दानी' चित्रपटात राणी मुखर्जीने पोलीस अधिकारी शिवानी रॉयची भूमिका साकारली होती आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मर्दानीचा दुसरा भाग २०१९ मध्ये आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले. आता यशराज फिल्म्सने 'मर्दानी ३' ची अधिकृत घोषणा केली आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चित्रपटाची घोषणा; म्हणाली हा मूव्ही डार्क, डेडली आणि ब्रूटल...
Allu Arjun Wife: अल्लू अर्जुन तुरूंगाबाहेर येताच पत्नीला अश्रू अनावर, धावत जाऊन मारली घट्ट मिठी, Video व्हायरल

या चित्रपटाबद्दल बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, “मला खूप आनंद आहे की आम्ही एप्रिल २०२५ मध्ये ‘मर्दानी ३’ चे शूटिंग सुरू करत आहोत. पोलिसांचा गणवेश घालणे आणि अशी व्यक्तिरेखा साकारणे ही एक खास गोष्ट आहे जी मला नेहमीच आवडते. आपल्या भूमिकेला पुन्हा न्याय दिल्याचा अभिमान आहे. हा चित्रपट त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी निस्वार्थीपणे दररोज कठोर परिश्रम करतात.

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चित्रपटाची घोषणा; म्हणाली हा मूव्ही डार्क, डेडली आणि ब्रूटल...
Allu Arjun : पुष्पाला जेवू दिलं नाही, थेट बेडरूममध्ये घुसले पोलीस? पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

राणी पुढे म्हणाली, “जेव्हा आम्ही ‘मर्दानी ३’ बनवण्याचा विचार केला तेव्हा आमचा उद्देश हा होता की हा चित्रपट प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा वेगळा अनुभव देणारा असावा. आम्हाला आशा आहे की हा तिसरा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 'मर्दानी ३' हा डार्क, डेडली आणि ब्रूटल असणार आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

‘द रेल्वे मेन’ फेम आयुष गुप्ताने ‘मर्दानी-३’ ची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यांच्या धारदार आणि प्रभावी लेखनशैलीचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहेत. अभिराजने यापूर्वी 'बँड बाजा बारात', 'गुंडे', 'सुलतान', 'जब तक है जान', 'टायगर ३' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या तो 'वॉर २' या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक असून आता त्याला 'मर्दानी' फ्रँचायझीची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com