Ranbir Kapoor -Ramayana : भारतीय चित्रपटाचा जगभरात बोलबाला, 'या' कारणांमुळे खास आहे रणबीर कपूरचा 'रामायण'

Ranbir Kapoor -Ramayana Movie Teaser : सध्या जगभरात फक्त 'रामायण' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. 'रामायण' चित्रपटाचा टीझर आज रिलीज होणार आहे. रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट इतका खास का, चला पाहूया.
Ranbir Kapoor -Ramayana Movie Teaser
Ranbir Kapoor -Ramayana saam tv
Published On
Summary

'रामायण' चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीला रिलीज होत आहे.

'रामायण' चित्रपटात बॉलिवूडचा हिरो रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत झळकणार आहे.

'रामायण' च्या माध्यामातून हिंदी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाची सुरुवात झाली आहे.

'धुरंधर'नंतर आता सर्वत्र रणबीर कपूरच्या 'रामायण'ची चर्चा पाहायला मिळत आहे. अखेर आज (२ एप्रिल ) रोजी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा पार पडणार आहे. चाहते नमित मल्होत्राच्या 'रामायण' चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. 'रामायण'चा टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित होत आहे. यातून चित्रपटातील मुख्य पात्र रामाच्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली जाईल. २०१७ मध्ये या 'रामायण'ची घोषणा करण्यात आली होती.

'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी २०२६ च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची भव्यता जगात भारी आहे. रामायणाचे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी सांगितल्यानुसार, 'रामायण' चित्रपटाचे दोन्ही भाग मिळून अंदाजे ₹४,००० कोटी बजेट आहे. या बजेटमुळे रामायण हा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. रामायणामध्ये मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.

Vicon Valkyrie System जी प्रति सेकंद २००० फ्रेम्स कॅप्चर करते. ती केवळ कलाकारांचा अभिनयच नव्हे, तर त्यांचे प्रत्येक चेहऱ्यावरील हावभावही रेकॉर्ड करते. इंटरस्टेलर आणि अवतार यांसारख्या हॉलिवूडच्या अव्वल चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेले परफॉर्मन्स कॅप्चर आणि व्हॉल्यूम कॅप्चर तंत्रज्ञान 'रामायण'मध्येही वापरण्यात आले आहे.

नमितची कंपनी DNEG जिने अनेक ऑस्कर-विजेत्या चित्रपटांच्या ग्राफिक्सवर काम केले आहे, तिने रामायणाच्या व्हिज्युअल्सवर काम केले आहे. हा चित्रपट विशेषतः आयमॅक्ससाठी विकसित करण्यात आला आहे. त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ते डब करण्यात आले आहे, ज्यामुळे कलाकारांच्या ओठांची हालचाल अजिबात जाणवत नाही. या सर्व तंत्रांचा एकच उद्देश आहे की, पौराणिक कथांमध्ये रुजलेले एक जग निर्माण करणे, एक असे जग ज्याची आपण या कथांसोबत कल्पना करतो.

'रामायण' हे देशातूनच जागतिक स्तरावर पोहोचणारे भारतीय महाकाव्य आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून प्रभू श्रीरामांची कथा जगभर पोहोचली जाणार आहे. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. माता सीतेच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. तर रावणाची भूमिका यश साकारणार आहे. लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे, भरताची भूमिका आदिनाथ कोठारे साकारणार आहे.

'रामायण' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 'रामायण'चा टीझर भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये दाखवण्यात आला होता. त्याला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Ranbir Kapoor -Ramayana Movie Teaser
Ajay Devgn Birthday : अभिनेता नाही तर 'हे' बनायचे होते बॉलिवूडच्या 'सिंघम'ला, एका चित्रपटाने नशीब पालटले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com