Surabhi Jayashree Jagdish
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा दिवस विशेष पवित्र मानला जातो.
पुराणकथांनुसार भगवान गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला. म्हणूनच हा दिवस माघी गणपती जयंती म्हणून ओळखला जातो. हा गणरायाच्या अवताराचा मूळ दिवस मानला जातो.
भाद्रपदातील गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. माघी गणपती जयंती ही अधिक वैयक्तिक आणि साधना-केंद्रित असते. नवस, उपवास आणि शांत पूजेला या दिवशी महत्त्व असतं.
पार्वती मातेने स्नानावेळी अंगमळापासून गणेशाची निर्मिती केली. त्याला द्वारपाल म्हणून उभं केल्याची कथा प्रसिद्ध आहे. हीच घटना माघ महिन्यात घडली अशी मान्यता आहे.
शिवाने गणेशाला गणांचा अधिपती केलं, अशी कथा आहे. या दिवशी शिव-पार्वतीचा आशीर्वाद गणरायाला मिळाला. म्हणून माघी चतुर्थीला सिद्धी-विनायक पूजेला महत्त्व आहे.
या दिवशी उपवास करून गणपतीची पुजा केली जाते. यावेळी संकटं दूर होतात आणि सर्वा इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. विशेषतः संतानसुख आणि कार्यसिद्धीसाठी हे व्रत केलं जातं.
माघी गणपतीला सिद्धी-विनायक स्वरूपात पूजलं जातं. हे रूप बुद्धी, यश आणि अडचणींवर मात करणारं मानलं जातं. म्हणून या दिवशी गणपतीच्या नावाचा जप केला जातो.