Raju Srivastava Health Update| राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत मॅनेजरने दिली नवीन अपडेट; बरे होतील पण...

देशातील कानाकोपऱ्यातून राजू बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
Comedian star Raju Srivastava
Comedian star Raju SrivastavaSaam TV

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन सुपरस्टार राजू श्रीवास्तव गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात आहे. जीममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि तातडीने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही. त्याचे कुटुंबीय, जवळचे मित्र, चाहते आणि निकटवर्तीय तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान राजू श्रीवास्तवच्या मॅनेजरने महत्वाची अपडेट दिली आहे.

हे देखील पाहा -

गेल्या आठवडाभरापासून राजूची (Raju Srivastava) प्रकृती चिंताजनक आहे. देशातील कानाकोपऱ्यातून राजू बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्याच्या प्रकृतीबाबत मॅनेजरने आता माहिती दिली आहे. राजूच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. मात्र तो अद्यापही बेशुद्धावस्थेत आहे. सध्या राजू व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. लवकरच तो बरा होईल पण यासाठी वेळ लागेल, असे मॅनेजर म्हणाला. (Raju Srivastava Health Update)

अलीकडेच, राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने राजूची प्रकृती स्थिर असून तो बेशुद्ध असल्याचे सांगितले होते. श्रीवास्तवची मुलगी अंतराने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, राजूची प्रकृती स्थिर असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत, असे सांगितले होते.

Comedian star Raju Srivastava
गुजरात सरकार बरखास्त करा; बीडमध्ये बिल्कीस बानो प्रकरणी महिला आक्रमक

शेखर सुमन यानेही आपल्या ट्विटमध्ये राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. राजू श्रीवास्तव अद्यापही शुद्धीवर आलेला नाही. मात्र डॉक्टरांनी सांगितले आहे की, बेशुद्धावस्थेत असला तरी, त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. देवाची कृपा आणि तुम्हा सगळ्यांमुळे हे शक्य झाल्याचे ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचा धाकटा भाऊ दीपू श्रीवास्तव याने राजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. व्हिडिओ शेअर करत म्हटले की, तुमच्या सर्वाचे लाडके, आमचे मोठे बंधू राजूजी अद्यापही व्हेंटीलेटरवर आहेत, आम्हाला विश्वास आहे की, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे लवकरच तो बरा होत आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्याच्यावर उपचार करत आहे. राजू भाई हे लढवय्ये आहेत आणि लवकरच लढाई जिंकून हसवायला येतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com