'तिच्याशिवाय हे शक्यचं नव्हतं...'; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लॉन्चवेळी रितेश भाऊंनी केलं बायकोचं कौतूक, जिनिलिया वहिनींना आलं रडू

Riteish genelia get emotional : ‘राजा शिवाजी’ ट्रेलर लॉन्चमध्ये रितेश देशमुखने जेनिलियाचं कौतुक केल्याने ती भावूक झाली. या भावनिक क्षणामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली.
Riteish genelia get emotional
Riteish genelia get emotional saam Tv
Published On

Riteish genelia get emotional : रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा दिमाखदार रितीने पार पडला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या ट्रेलरचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पण या ट्रेलर लॉन्चवेळी एक सुंदर भावनिक क्षण पाहायला मिळाला. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने पत्नी जेनिलिया देशमुख हिचं भरभरून कौतुक केल्याने संपूर्ण कार्यक्रम भावनिक झाला.

मुंबईत पार पडलेल्या या भव्य ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी रितेशने सर्व कलाकारांच्या भक्कम पाठिंब्यासाठी आभार मानले आणि शेवटी जेनिलियाचे कौतूक करताना म्हणाला, "मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. पण हे सगळं होत असताना अशी एक व्यक्ती होती जिच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. पण ती साकार करण्याची जिद्द असते. ज्यात जिनिलियाने एक निर्माती म्हणून नेहमी साथ दिली", असं रितेश आणि जिनिलिया यांना अश्रू अनावर झाले. 

Riteish genelia get emotional
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

दरम्यान,  'राजा शिवाजी' चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक बच्चन संभाजी महाराज, विद्या बालन छोटी बेगम, संजय दत्त अफजल खान, भाग्यश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Riteish genelia get emotional
Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेची कथा मोठ्या पडद्यावर साकारण्यात येणार आहे.‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com