Pushkar Jog New Car: "डड्डा तू रेंज रोव्हर कधी घेणार?" मराठमोळ्या अभिनेत्यानं लेकीसाठी घेतली अलिशान कार, Video

पुष्कर जोगने त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने नवीन कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पुष्कर जोगच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
Pushkar Jog New Car
Pushkar Jog New CarSaam Tv
Published On

मराठमोळा प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोगने लाडक्या लेकीची इच्छा पूर्ण केली आहे. नुकतंच सोशल मीडियावर पुष्कर जोगने त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने नवीन कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पुष्कर जोगच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Pushkar Jog New Car
Chhaava Movie Box Office Collection: विकीच्या 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई; आकडा वाचून डोळे फिरतील

पुष्करने आपल्या लाडक्या लेकीसाठी खास नवीकोरी कार खरेदी केलं असल्याचं म्हटलं आहे. त्याने म्हटलय की, फेलिशा म्हणजेच त्याची लेकीने दुबईत असताना, "डड्डा तू रेंज रोव्हर केव्हा घेणार?" असं विचारलं होते. यानंतर अखेर त्याने लेकीसाठी रेंज रोव्हर कार घेतली आहे.

अभिनेता पुष्कर जोगने मुलीसोबतचा नवीन कारचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. पुष्करची लेक फेलिशा कारची पूजा करताना दिसत आहे. या दोघांनी मिळून कारचं सेलीब्रेशन करत कारची पहिली झलक दाखवली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने, "आई आणि बाबा यांचा आशीर्वाद... अमोल दादा थँक्स... फेलिशाने मला दुबईत विचारलं होतं डड्डा तू रेंज रोव्हर कार कधी घेणार? माय जान, माय एंजेल ही गाडी तुझ्यासाठी आहे. पुढे त्याने होय मराठी कलाकार सुद्धा रेंज रोव्हर कार खरेदी करू शकतात" असं म्हटलं आहे.

Pushkar Jog New Car
Salman Khan: सिकंदरनंतर सलमान खानचा 'हा' चित्रपट येणार भेटीला; ११ वर्षांनंतर करणार ब्लॉकबस्टरचा सिक्वल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com