
जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.काश्मीरमधील हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता अनेक कलाकारांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेवर मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मिडिया पोस्ट शेअर केली आहे. (Pushkar Jog Angry On Pahalgam Attack)
पुष्कर जोगने (Pushkar Jog Post) दहशतवादी हल्ल्यावर पोस्ट दिली आहे. त्याने म्हटलंय की, मी आयसीसी आणि बीसीसीआयला विनंती करतो की, पाकिस्तानबरोबर कोणत्याही सामन्याचं आयोजनं करु नये. दरी यातून आर्थिक फायदा होणार असेल तरीही त्यांच्यासोबत कोणत्याही मालिका खेळू नयेत. आता पुरे झालं. आपल्या सैनिकांचं, अधिकाऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं आयुष्य किती महत्त्वाचं आहे हे पटवून ही आपली प्राथमिकता असेल, जय हिंद, जय भारत!, आपण हिंदु-मुस्लीम सर्व एक आहोत, दहशतवादाविरोधात एकत्र लढू, एकजुटीने उभं राहू,असं त्याने म्हटलं आहे.
पुष्कर जोगसोबत अनेक मराठी अभिनेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.समीर परांजपे, प्रथमेश परब, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, मेघा धाडे या कलाकारांनीही सोशल मिडिया पोस्ट करत काश्मीरमधील हल्ल्याबाबत संपात व्यक्त केला आहे.
२२ एप्रिलला काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) करण्यात आला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यात निष्पाण पर्यटकांचा जीव गेला. यामध्ये २८ पर्यटकांना मारण्यात आले. त्यातील ६ जण हे महाराष्ट्रातील रहिवासी होते. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या कोणत्याही पर्यटकाने आपल्यासोबत असं काही घडेल, याचा विचार केला नव्हता. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.