Coldplay: कोल्डप्लेच्या मंचावर मराठी कलाकारांची जादू; बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्येंनी गाजवला रंगमंच!

Coldplay Concerts: प्रसिद्ध बाहुलीकार रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजित रामदास पाध्ये आणि त्याच्या टीमने कोल्डप्ले कॉन्सर्टच्या भारत दौऱ्यात पपेट शो सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले.
Coldplay Concerts Satyajit Padhye
Coldplay Concerts Satyajit PadhyePR
Published On

Coldplay: एक स्वप्न सत्यात उतरलं, जेव्हा शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या प्रतिभावान पपेटियर सहरकारी म्हणजेच कौस्तुभ, सुषांत, आणि कैलाश यांनी प्रसिद्ध कोल्डप्ले बँडसोबत भारत दौऱ्यात मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स करत कौतुकास्पद काम केले.

कोल्डप्लेच्या टीमने खास सत्यजित आणि त्याच्या टीमला या शोमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी आमंत्रित केले होते . क्रिस मार्टिन आणि त्यांच्या बँडसोबत “गुड फिलिंग्स” या गाण्यावर सत्यजित आणि त्याच्या टीमने अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे प्रेक्षकांना संगीत आणि पपेट्रीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.

Coldplay Concerts Satyajit Padhye
Crazxy Release Date: 'दादी सो जा वरना....'; सोहम शहाने केली हटके स्टाईलमध्ये 'क्रेझी' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा

प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणामुळे, सत्यजित पाध्ये आणि त्याच्या टीमने ५ ऐतिहासिक शोमध्ये आपल्या कलागुणांनी जादू निर्माण केली आणि हा क्षण अविस्मरणीय केला.

Coldplay Concerts Satyajit Padhye
Shahid Kapoor: 'मी प्रेमात खूपवेळा... व्हॅलेंटाइन डेच्या आधी शाहिद कपूरनं सांगितली हार्टब्रेक स्टोरी

शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये म्हणाला

या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल कोल्डप्लेला मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे मनःपूर्वक आभार तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आम्हाला जगातील सर्वात मोठ्या कोल्डप्ले कॉन्सर्टचा भाग बनविल्याबद्दल धन्यवाद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com