Priyanka Chopra : जशी आई तशी मुलगी; प्रियांकाच्या मुलीचा क्यूट डान्सिंग व्हिडीओ व्हायरल

प्रियांकाने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खूश केले आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On: 

मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस(priyanka chopra) सध्या तिच्या मदरहुड इंजॉय करत आहे. प्रियांका दररोज तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते. आता प्रियांकाने तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खेळताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर(Social Media) खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने इन्स्टाग्राम हँडलवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे. प्रियांकाने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खूश केले आहे.

Priyanka Chopra
VIDEO: ईशान खट्टरचे समुद्रकिनारी 'ड्रीम हाउस', चाहत्यांना दाखवली नव्या घराची झलक

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रियांका अनेकदा तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान, प्रियांकाने मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'ससुराल गेंदा फूल' हे गाणे वाजत आहे. या गाण्यात मालती कॅमेराकडे वळणारच होती की प्रियांकाने तिच्या मुलीला थांबवले.

Priyanka Chopra
Marathi Web Series: चित्तथरारक माईंड गेम…; सुबोध भावेची 'कालसुत्र'मधून OTT वर एन्ट्री, पाहा Trailer

प्रियांका आणि निक यांनी मुलगी मालतीचा चेहरा दाखवला नसला तरी चाहत्यांच्या आनंदासाठी ते मालतीचे फोटो शेअर करत असतात. प्रियांकाने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूपच आवडला आहे. अभिनेता फरहान अख्तरसह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी ही पोस्ट लाईक केली आहे.दरम्यान, मालतीचा जन्म या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे झाला होता.

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'द व्हाइट टायगर' होता. त्याचबरोबर ती 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय हॉलिवूड चित्रपट 'सिटाडेल' आणि 'एंडिंग थिंग्ज' देखील प्रियांकाच्या खात्यात समाविष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.