VIDEO: ईशान खट्टरचे समुद्रकिनारी 'ड्रीम हाउस', चाहत्यांना दाखवली नव्या घराची झलक

ईशानने मुंबईत समुद्रासमोर घर विकत घेतले आहे. जे मॉडर्न आणि क्लासिक डिझाइनचे उत्तम उदाहरण आहे.
Ishaan Khattar
Ishaan Khattar Saam Tv
Published On: 

मुंबई: ईशान खट्टर( ishaan khatter) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम युवा कलाकारांपैकी एक आहे. सगळ्यांप्रमाणेच ईशाननेही स्वप्नांच्या शहरात समुद्राभिमुख घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ह स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात फार कमी जण यश मिळत, पण 'धडक'(Dhadak) चित्रपटाच्या या अभिनेत्यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ईशानने मुंबईत समुद्रासमोर घर विकत घेतले आहे. जे मॉडर्न आणि क्लासिक डिझाइनचे उत्तम उदाहरण आहे.

Ishaan Khattar
Marathi Web Series: चित्तथरारक माईंड गेम…; सुबोध भावेची 'कालसुत्र'मधून OTT वर एन्ट्री, पाहा Trailer

ईशान खट्टरने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याच्या स्वप्नातील घराची झलक शेअर केली आहे. आपल्या घराचा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, 'घर माझ्यासाठी नेहमीच खाजगी जागा आहे, परंतु माझे पहिले अपार्टमेंट बांधणे ही एक आनंददायी प्रक्रिया होती. मला तुम्हाला माझ्या नवीन घरी आमंत्रित करण्यात आनंद होत आहे'.

ईशानच्या या पोस्टचा कमेंट बॉक्स शुभेच्छांनी भरलेला आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदानने लिहिले, 'माझ्या मुलाचे खूप अभिनंदन.' तर बानीजे ने कमेंट करत घराच्या सजावटीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर बी-टाऊनमधील अनेक कलाकारांनी ईशानचे कौतुक केले आहे.

Ishaan Khattar
VIDEO: शहनाजचे 'लोग हमसे जलते हैं' गाणं ऐकून चाहत्यांना आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण; चाहते म्हणाले...

ईशानचे घर वेस्ट एल्म इंडियाने डिझाइन केले आहे. घराचा व्हिडीओ शूट करताना तो असे म्हणतो की, 'माझे घर मॉडर्न दिसावे पण त्याला क्लासिक टचही हवा होता. मला लिव्हिंग रूम खूप साधी ठेवायची इच्छा होती कारण माझ्या घरासमोर समुद्राचे सुंदर दृश्य आहे. मला या जागेचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे.'

व्हिडिओमध्ये, ईशानने प्रेक्षकांना व्हीडीओच्या माध्यमातून त्याचे सुंदर लिव्हिंग रूम आणि मॉडर्न फर्निचरसह जुन्या क्लासिक शैलीतील बेडरूम दाखवले आहे. त्याच्या खोलीत एक मोठी खिडकी आहे, ज्यामुळे समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. बहुतेक फर्निचर आणि भिंती बेज आणि पांढर्‍या रंगांनी सजवल्या जातात. त्याच्या एका खोलीत एक मोठा टीव्ही आणि बुकशेल्फ आहे, ज्यामध्ये त्याच्या अवॉर्ड्ससाठीही जागा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.