Nick Jonas Performance: निक जोनसचा मुंबईत धमाकेदार परफॉर्मन्स, 'जीजू जीजू...' म्हणत फॅन्सचा कल्लोळ!

Nick Jonas Performance In Mumbai: प्रियांका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध गायक निक जोनासने मुंबईमध्ये पहिल्यांदाच परफॉर्मन्स केलाय. चाहत्यांनी चांगलीच दाद दिल्याचं दिसतंय.
Nick Jonas
Nick Jonas Google

Nick Jonas In Mumbai

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा पती निक जोनास (Nick Jonas Performance) याने शनिवारी मुंबईतील लोल्लापालूझा कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स केलाय. या कार्यक्रमासाठी निक त्याचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनाससह भारतात आलाय. म्युझिक कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (latest entertainment news)

व्हिडिओमध्ये निक जोनास परफॉर्म करताना दिसत आहे. जेव्हा तो स्टेजवर पोहोचतो तेव्हा लोक त्याच्यावर मोठ्याने ओरडून त्याला जीजु जीजु' म्हणत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाहत्यांमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण

व्हिडिओमध्ये निक जोनास प्रसिद्ध गायक राजासोबत 'तू मान मेरी जान' गाणे गाताना दिसत आहे. मंचावर दोघांची जुगलबंदी प्रेक्षणीय होती. यावेळी कॉन्सर्ट पाहण्यासाठी आलेले लोकही निक जोनाससोबत गाणी म्हणत होते. प्रेक्षकांमध्ये खूप जल्लोषाचं वातावरण होतं. निक जोनासच्या लोल्लापालूझा येथील परफॉर्मन्सचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत (Nick Jonas Performance In Mumbai) आहे.

एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये निक जोनास स्टेजवर पोहोचताच लोक मोठ्याने 'जीजू-जीजू' असं ओरडत आहेत. यावर निक जोनासने चाहत्यांना प्रतिक्रिया दिलीय. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, असं निक म्हटला आहे. निक जोनासने पहिल्यांदाच भारतात परफॉर्मन्स केलाय. यादरम्यान त्याला भारतीय चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

2018 साली मोठ्या थाटामाटात लग्न

निक जोनास (Nick Jonas) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी 2018 साली लग्न केलं आहे. दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. 2017 मध्ये मेट गालामध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांचे बोलणं सुरू झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. प्रियांका आणि निक जानेवारी 2022 मध्ये आई बाबा झाले. मालती मेरी चोप्रा जोनास, असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.

प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ॲक्शन स्पाय वेब सीरीज 'सिटाडेल' मध्ये दिसली होती. यामध्ये तिने हॉलिवूड स्टार रिचर्ड मॅडनसोबत स्क्रीन शेअर केली होती. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली.

Nick Jonas
Nick Jonas Fall Off Stage: लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवरून पडला निक जोनास; प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com