Joe Jonas And Sophie Turner Divorce: प्रियांका चोप्राचा दीर घेणार घटस्फोट, जो जोनास- सोफी टर्नर यांच्या ४ वर्षांच्या नात्यात दुरावा

Priyanka Chopra Borther In Law Divorce: जो जोनास (Joe Jonas) आणि त्याची पत्नी अभिनेत्री सोफी टेर्नन (Sophie Turner) हे हॉलिवूडचे प्रसिद्ध कपल आहेत.
Joe Jonas And Sophie Turner Divorce
Joe Jonas And Sophie Turner DivorceSaam Tv

Joe Jonas And Sophie Turner: 

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनास (Priyanka Chopra-Jonas) सध्या तिच्या कुटुंबांमुळे चर्चेत आहे. ग्लोबल आयकॉन असलेल्या प्रियंका चोप्राचा दीर जो जोनास (Joe Jonas) आणि त्याची पत्नी अभिनेत्री सोफी टेर्नन (Sophie Turner) हे हॉलिवूडचे प्रसिद्ध कपल आहेत. दोघांनाही भारतामध्ये खूप चांगली पसंती मिळते.

या दोघांची केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडते. पण जो जोनस आणि सोफी टेर्ननच्या चाहत्यांसाठी खूपच वाईट बातमी आहे. सध्या या कपलच्या नात्यामध्ये दूरावा आला असून त्यांच्या घटस्फोटाच्या (Joe Jonas And Sophie Turner Divorce) बातम्या समोर येत आहेत.

Joe Jonas And Sophie Turner Divorce
Salman Khan Video: 'भाईजान'च्या समोर नाचणारा हा चिमुकला आहे मराठी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहिती आहे का?

निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनास आणि त्याची पत्नी सोफी टर्नर यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्यांचा चार वर्षांचा सुखी संसार मोडणार असल्याचे सांगितले जात आहे. हे कपल लवकरच घटस्फोट घेणार आहेत. यासाठी त्यांनी लॉस एंजेलिसमधील एका वकिलांचा देखील संपर्क केला असून त्यांचा सल्ला घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आवडते कपल आता वेगळे होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Joe Jonas And Sophie Turner Divorce
Gadar 2 24 Day Collection: बॉक्स ऑफिसवर 'गदर २'ची जादू कायम, कमाईचा आकडा ५०० कोटीं पार; 'पठाण' आणि 'बाहुबली २' चा रेकॉर्ड केला ब्रेक

हॉलिवूड कपल सोफी टर्नर आणि जो जोनास यांच्याशी संबंधित अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या जोच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसली नव्हती. त्यामुळे दोघांमधील नातेसंबंधामध्ये अडचण आले असल्याचे म्हटले जात होते. तेव्हापासून जो आणि सोफीच्या नात्यात काहीतरी गडबड असल्याचा अंदाज चाहत्यांना आला होता.

Joe Jonas And Sophie Turner Divorce
Journey Release Date Declared: असामान्य संघर्षाची ‘जर्नी’ लवकरच उलगडणार, ‘या’ तारखेला येणार भेटीला

याशिवाय दोघांनी काही काळापूर्वी त्यांची मियामी येथील आलिशान बंगला विकला होता. याशिवाय अनेक रिपोर्ट्समध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, सोफी आणि जोचे नाते गेल्या 6 महिन्यांपासून चांगले चालले नाही. दोघांमध्ये अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पण प्रयत्न करुनही काही झाले नाही. तेव्हा या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Joe Jonas And Sophie Turner Divorce
Kiran Mane On SRK Jawan Film: ‘पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच...’; किरण मानेची ‘किंग खान’साठी खास शैलीत पोस्ट

दरम्यान, सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी २०१६ पासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर २०१७ मध्ये दोघांनी एंगेजमेंड केली. दोघांनीही आपले नाते जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले. सोफी आणि जोच्या लग्नापर्यंत कोणालाच त्यांच्या नात्याबद्दल माहिती नव्हती. सोफी आणि जोने २०१९ मध्ये लास वेगासमध्ये गुपचूप लग्न केले होते. या लग्नाला फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र उपस्थित होते. या कपने आपल्या पहिल्या बाळाची घोषणा करतानाच लग्नाची घोषणा केली होती. या कपलला दोन मुलं आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com