बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) स्टारर ‘गदर २’ चित्रपटाची (Gadar 2 Movie) बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. २४ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करत आहे.
सध्या या चित्रपटाने 'पठाण' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करत ५०० कोटीं पार गल्ला जमवला आहे. ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा 'गदर २'हा बॉलिवूडचा तिसरा चित्रपट ठरला आहे. नुकताच या चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
'गदर 2' चित्रपटाने रविवारी रिलीजचा २४ व्या दिवशी देखील जबरदस्त कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या तीन आठवड्यांत चित्रपटाने ज्या वेगाने कमाई केली. त्यामुळे चौथ्या वीकेंडपूर्वीच हा चित्रपट ५०० कोटीं पार कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. आणि तो अंदाज अखेर खरा ठरला. या चित्रपटाने २४ व्या दिवसांपर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्त विक्रमी कमाई केली आहे.
या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी रुपये कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात १३४.४७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर तिसऱ्या आठवड्यात ६३.३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे चौथ्या शुक्रवार आणि शनिवारचे कलेक्शन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामु याळे चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या शनिवारपर्यंत ४९३.३७ कोटी रुपयांची कमाई केली. त्यात रविवारच्या दिवसाने तर कमालच केली. रविवारच्या कलेक्शनच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार चित्रपटाने सुमारे ८.५० कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईसह या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा आकडा पार केला.
दरम्यान, ५०० कोटी रुपयांच्या नेट क्लबमध्ये एन्ट्री करणारा 'गदर २' हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. एसएस राजामौलीचा ‘बाहुबली २ द कन्क्लूजन’ आणि शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटांप्रमाणेच 'गदर २' ने देखील ५०० कोटींची कमाई केली आहे. महत्वाचे म्हणजे, या तिन्ही चित्रपटांमध्ये 'गदर २' चित्रपटाने सर्वांत जास्त वेगाने ऐतिहासिक कमाई केली आहे. कारण 'पठाण' चित्रपटाने २८ दिवसांमध्ये ५०० कोटींचा गल्ला जमवला होता. तर 'बाहुबली २' ने ३४ दिवसांमध्ये ५०० कोटींची कमाई केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.