Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

Pravin Tarde: नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड कलाकारांची कमी उपस्थिती असल्यावर प्रवीण तरडे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी, नानांचे व्यक्तिमत्त्व आणि बॉलिवूडबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
pravin tarde on nana patekar Funeral
pravin tarde on nana patekar FuneralSaam Tv
Published On: 

Pravin Tarde: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. मात्र, बॉलिवूडमधील कलाकारांची उपस्थिती कमी असल्याच्या चर्चेवरून आता मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘नानांपेक्षा बॉलिवूड मोठं नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

प्रवीण तरडे बॉलिवूडवर संतापले

एबीपी माझाच्या ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात बोलताना प्रवीण तरडे यांनी नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या लोकांविषयी भाष्य केले. बॉलिवूडमधील कलाकार अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून नानांचे मोठेपण कमी होत नाही, असे ते म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रवीण तरडे म्हणाले, बॉलिवूडवाले अंत्यसंस्काराला आले नाहीत म्हणून नानाचं मोठेपण कमी होत नाही. नानापेक्षा बॉलिवूड मोठं नाही. नाना खूप मोठे होते.

pravin tarde on nana patekar Funeral
Famous Actress Death: मराठी मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

नानांच्या अंत्ययात्रेला काही हजार शेतकरी आले

प्रवीण तरडे पुढे म्हणाले, नानांच्या अंत्ययात्रेला काही हजार शेतकरी आले होते, त्यांच्या अंगाला घामाचा, मातीचा वास होता. बॉलिवूडमधल्या परफ्युम मारलेल्या कोणापेक्षा तो शेतकरी महत्त्वाचा आहे. माझ्या मते धुळ्यातून आलेला शेतकरी बॉलिवूडमधल्या हिरोंपेक्षा खूप मोठा आहे. नाना कधी मी मी बॉलिवूडचा आहे वगैरे म्हणाले नाही ते नेहमी मी मी शेतकरी आहे म्हणायचे

pravin tarde on nana patekar Funeral
Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

नानांच्या मित्रांनी तरी यायला हवे होते

प्रवीण तरडे शेवटी म्हणाले, माझी तक्रार म्हणाल तर तक्रार आहेच, अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधल्यांनी यायला पाहिजे होतं. निदान ज्यांना नानानी मित्र म्हटलं होतं त्यांनी तरी यायला हवं होतं. जॅकी श्रॉफ, सुरेश वाडकर हे आले होते. मुंबईत छोटासा नट गेला, तर पांढरे कपडे घालून रांगा लागतात, पण ठीक आहे, शेतकरी आले होते, आम्हीही आलो होतो. असे म्हणत प्रवीण तरडेंनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com