Vadapav: गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची ‘शतकपूर्ती’

Vadapav Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक खास चित्रपट रंगतदार मेजवानी घेऊन येतोय. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा शंभरावा चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Vadapav Marathi Movie
Vadapav Marathi MovieSaam TV
Published On

Vadapav Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक खास चित्रपट रंगतदार मेजवानी घेऊन येतोय. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा शंभरावा चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

हा चित्रपट एका गोड कुटुंबाच्या तिखट-गोड नात्यांची कहाणी सांगतो. कौटुंबिक मूल्य, नात्यांचा गोडवा, चुरचुरीत प्रसंग आणि भावनिक क्षण यांचा सुंदर संगम यात दिसणार आहे. विशेष म्हणजे प्रसाद ओक यांनी यामध्ये अभिनयासोबत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असल्यामुळे त्यांचा हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरणार आहे.

Vadapav Marathi Movie
Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये 'या' स्पर्धकाच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक नाराज; दिला पहिलं एलिमिनेट करण्याचा सल्ला

या चित्रपटात प्रसाद ओक यांच्यासोबत अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.

Vadapav Marathi Movie
Salman Khan: सलमान खानने अजून लग्न का केलं नाही? बिग बॉसमध्ये स्वत:च सांगितलं खरं कारणं

निर्मात्यांच्या मते, ‘वडापाव’ही कथा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासारखी आहे. हा सिनेमा हसवणार, भावूक करणार आणि प्रेक्षकांना विचार करायलाही लावणार, असा विश्वास टीमने व्यक्त केला आहे.

प्रसाद ओक म्हणाला की, जसा वडापाव सर्वांनाच आवडतो तसाच हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. नात्यांमधील गोडवा आणि तिखटपणाचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक घराशी नातं जोडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com