सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताचा व्हिडीओ समोर आला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
निसर्ग, शेती आणि मातीशी असलेलं तिचं नातं या व्हिडीओतून पुन्हा एकदा पाहायला मिळालं
Prajakta Mali Birthday Celebration Video: वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. प्रत्येकजण वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतो. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील वाढदिवसानिमित्त काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ९ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो. यावर्षी प्राजक्ता माळीने हटके अंदाजात वाढदिवस साजरा केला आहे. ज्याची सध्या चर्चा रंगली आहे. तुम्ही देखील तिचा व्हिडीओ एकदा पाहा.
अभिनेत्री प्राजक्ताने सोलापूरमधील तिच्या गावी कुटुंबियासोबत वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्राम हॅडलवर या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तिने शेअर केले आहेत. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्राजक्ता सोलापूरमधील तिच्या गावी शेतामध्ये काम करत आहे. 'इंद्रायणी' भात शेती करताना प्राजक्ता दिसतेय. चिखलाने भरलेल्या शेतात उतरून भाताची रोपं लावत आहे. तिच्यासोबत तिच्या जवळच्या व्यक्ती देखील दिसत आहेत. अत्यंत आनंदमय वातावरणात प्राजक्ता दिसते आहे. शेतात राबतानाचा प्राजक्ताचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने 'शेतकरी प्रमाणपत्र आहेच, त्याला वाढदिवसाला जागले.. भात शेतीत (इंद्रायणी) तासभर राबलो.. श्रमदान' असे कॅप्शन दिले आहे. या प्राजक्ताच्या हटके सेलिब्रेशन पाहून तिचं निसर्ग, शेती आणि मातीशी असलेलं तिचं नातं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी वाढदिवसानिमित्त तिने केलेल्या या कामाचं कौतुक केलं आहे.