
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच चर्चेत असते. महाशिवरात्री निमित्ताने नाशिक येथी त्र्यांभकेश्वरमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळीला आमंत्रित करण्यात आले होते. पण, या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला. त्यामुळे आता प्राजक्ताने या प्रकरणावर व्हिडीओ पोस्ट करत आपले मत मांडले आहे.
या विरोधावर प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणाली, “यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं, असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की ‘आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेले आहेत. फुलवतींच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्हीदेखील भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदाच्या वर्षी तुम्ही शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का?’ सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज नृत्यदेवता आहेत, म्हणून मी अजिबात वेळ न दवडता तात्काळ होकार कळवला,”
प्राजक्ता पुढे म्हणाली, मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आहे. मी सांगू इच्छिते की मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विषारद, अलंकार आहे. तसेच, बीए. एमए केलंय. अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू-परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये.
देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतं, सगळे भक्त असतात आणि त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजांच्या चरणी अर्पण करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव शिवार्पणमस्तू असं आहे. सगळा शिवावर आधारित कार्यक्रम आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल, तर विश्वस्त आणि पोलीस जो निर्णय घेतली तो सामाजिक भान बाळगत सर्वांनाच बंधनकारक असेल असे पुढे प्राजक्ता म्हणाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.