Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या आयुष्यात ‘या’ खास व्यक्तीची एन्ट्री; व्हिडिओ पोस्ट करत दिली गुड न्यूज

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने आज सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा खास कलाकारासोबत पाहायला मिळणार असून चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
Prajakta Mali
Prajakta MaliSaam Tv
Published On

Prajakta Mali: मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सोशल मिडियावरुन एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओपाहून ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेच्या प्रेक्षकांना फारच आनंद झाला आहे. कारण लवकरच मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आदित्य आणि मेघनाची भूमिका साकारत या जोडीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. आता तब्बल 13 वर्षांनंतर हीच जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यासाठी, 'आणि आम्ही परत एकत्र आलो… गेली १३ वर्ष हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला आणि तुम्हाला परत प्रेमात पाडायला ही जोडी परत येतेय 'शुभ मंगलम जोडी दंगलम' १ मे २०२७ पासून चित्रपटगृहात The OG Jodi is back या वेळेस गाठी जुळणार थेट destination wedding ला अशा शब्दांत या जोडीने चाहत्यांना ही खास गुड न्यूज दिली.

Prajakta Mali
सलमान खानच्या अडचणी वाढणार? 'काला हिरण' चित्रपटाचा वाद सुप्रीम कोर्टात; निर्मात्यांनी हायकोर्टाच्या आदेशाला दिलं आव्हान

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि ललित यांची भेट अगदी ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणाऱ्या अंदाजात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने चाहत्यांनी या घोषणेवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या.

Prajakta Mali
Ashok Saraf: 'डबल मिनिंग जोक्स दीर्घकाळ चालत नाही...'; अशोक मामांचा दादा कोंडकेंच्या विनोदावर टोला

यावेळी प्राजक्ता आणि ललितच्या व्यक्तिरेखांची गाठ नेमकी कशी जुळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रेमकहाणी, लग्नसोहळा, धमाल आणि प्राजक्ता-ललितची लोकप्रिय केमिस्ट्री यामुळे ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’कडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तब्बल 13 वर्षांनंतर प्रेक्षकांना त्यांची आवडती ‘आदित्य-मेघना’ची जोडी नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 1 मे 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com