Famous Actor Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेता हरपला; मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Death: 'चक दे इंडिया’ फेम अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन झाले. अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 bollywood actor Ramakant Dayama passes away
bollywood actor Ramakant Dayama passes away Saam Tv
Published On

Famous Actor Death: हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी विश्वातील ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन झाले आहे. मंगळवार, २६ मे रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली.

रमाकांत दायमा यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५६ रोजी झाला. रमाकांत दयामा यांनी अनेक लोकप्रिय मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवर काम करत आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली होती. ‘चक दे इंडिया’, ‘स्कॅम 1992’ यांसारख्या गाजलेल्या प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. छोट्या पडद्यावरील त्यांच्या सहज अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून होते.

 bollywood actor Ramakant Dayama passes away
Akshay Kumar Troll: अक्षय कुमार बनला भोजपुरी 'आयटम बॉय'; 'घिस घिस घिस' गाण्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल

शुभांगी लाटकर यांनी रमाकांत दयामा यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर करत भावनिक शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज आपण एक अत्यंत सुंदर मनाचा माणूस गमावला आहे. रमाकांतजी फक्त मित्र नव्हते, तर मार्गदर्शकही होते.” त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू झाला.

 bollywood actor Ramakant Dayama passes away
Ranveer Singh: रणवीर सिंहला 'डॉन 3'मधून एक्झिट घेणं पडलं महागात; FWICEने अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून रमाकांत दयामा यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या जाण्याने हिंदी मनोरंजन विश्वातील एक अनुभवी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

रमाकांत दयामा हे अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यशस्विनी दायमाचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रमाकांत दयामा यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com