Pooja- Siddhesh Mehndi Ceremony: पूजा सावंतच्या हाताला लागली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, अभिनेत्रीच्या ड्रेसने वेधले लक्ष

Pooja- Siddhesh Mehndi Video: अभिनेत्री पूजा सावंत आणि बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. संगीतनंतर अभिनेत्रीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे.
Pooja- Siddhesh Mehndi Ceremony
Pooja- Siddhesh Mehndi CeremonyInstagram
Published On

Pooja- Siddhesh Mehndi Ceremony

सध्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कपल्स लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. शिवानी- अजिंक्य, प्रथमेश- क्षितीजानंतर आता आणखी एक कपल लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्री पूजा सावंत आणि बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाण यांचा नुकताच साखरपुडा आटोपला. आता अभिनेत्रीच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. संगीतनंतर अभिनेत्रीचा आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. सध्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Marathi Actress)

Pooja- Siddhesh Mehndi Ceremony
Kenneth Mitchell: कॅप्टन मार्वलच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे ४९ व्या वर्षी निधन, गंभीर आजाराशी झुंज अपयशी

नुकतंच राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर मेहंदीचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. यामध्ये अभिनेत्री मेहंदीसाठी रेडी असल्याचे दिसत आहे. तर सिद्धेशचा मेहंदीचा कार्यक्रम काल रात्री पार पडला. सध्या दोघांच्याही मेहंदीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पूजाने मेहंदीसाठी एकदम खास डिझाइन असलेला मल्टीकलर लेहेंगा परिधान केला आहे. यावेळी तिने लूकला साजेसे भरजरी दागिनेही परिधान केले होते. यावेळी फॅमिलीसोबत अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही उपस्थिती लावली होती. (Social Media)

या स्पेशल लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती. तिच्या मेहंदीसाठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी मित्र व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती. अभिनेत्रीच्या फॅशनची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. तिच्या ह्या स्टायलिश लूकवर सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसते. या कपलच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. गेल्या वर्षीच अभिनेत्रीने आपल्या रिलेशनची माहिती दिली होती. नुकतंच पूजाने गुपचूप साखरपुडा आटोपला होता. नुकतंच पूजा- सिद्धेशच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झालेली आहे.(Wedding Video)

Pooja- Siddhesh Mehndi Ceremony
Ronit Roy Gets Angry: डिलेव्हरी बॉयची एक चूक पडली असती महागात, संतप्त होत रोनित रॉयने ‘स्विगी’ला झापलं

पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. २८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो. (Entertainment News)

Pooja- Siddhesh Mehndi Ceremony
Sushant Singh Rajput ने जे केलं ते करण्याचा विचार मी पण केला होता, Vivek Oberoi ने सांगितला कठीण काळातला अनुभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com