Ronit Roy Gets Angry: डिलेव्हरी बॉयची एक चूक पडली असती महागात, संतप्त होत रोनित रॉयने ‘स्विगी’ला झापलं

Ronit Roy: डिलिव्हरी बॉयचे चुकीच्या दिशेने गाडी चालवण्यावर रोनित रॉय संतापला आहे. रोनितने त्या डिलिव्हरी बॉयचा जीव वाचवला आहे.
Ronit Roy Gets Angry
Ronit Roy Gets AngrySaam Tv
Published On

Ronit Roy Gets Angry

आपण अनेकदा ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून जेवण ऑर्डर करतो. हिच ऑनलाईन ऑर्डर आपल्याकडे पोहोचवण्यासाठी डिलेव्हरी बॉय कशाही पद्धतीने गाडी चालवतात. अशा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणं अनेकदा आपल्या जीवाशी येते. असाच काहीसा प्रकार घडलाय बॉलिवूड अभिनेता रोनित रॉय याच्यासोबत. डिलिव्हरी बॉयचे चुकीच्या दिशेने गाडी चालवण्यावर रोनित रॉय संतापला आहे. रोनितने त्या डिलिव्हरी बॉयचा जीव वाचवला आहे. त्याच्या ह्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood)

Ronit Roy Gets Angry
Sushant Singh Rajput ने जे केलं ते करण्याचा विचार मी पण केला होता, Vivek Oberoi ने सांगितला कठीण काळातला अनुभव

अभिनेता प्रवास करत असताना त्याने एका ऑनलाईन डिलिव्हरी बॉयचा जीव वाचवला आहे. तो डिलिव्हरी बॉय चुकीच्या रस्त्याने इलेक्ट्रिक मोपेड चालवत होता. चुकीच्या बाजुने दुचाकी चालवणं त्या डिलेव्हरी बॉयच्या जीवावर बेतलं असतं. यामुळे अभिनेत्याने स्विगी या डिलेव्हरी ॲपची चांगलीच कानउघडणी केली आहे. अभिनेत्याने नुकतंच एक ट्वीट शेअर केलं आहे. हे ट्वीट शेअर करताना अभिनेत्याने ‘स्विगी’लाही टॅग केलं आहे. (Bollywood News)

Ronit Roy Gets Angry
Article 370 Vs Crakk Collection: ‘आर्टिकल ३७०’ की ‘क्रॅक’; पहिल्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई कुणाची?

रोनित रॉयने या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘स्विगी’ मी तुमच्या एका रायडरला ऑलमोस्ट मारलंच असतं. इलेक्ट्रिक मोपेड चालवणे याचा अर्थ असो होत नाही की ट्रॅफिकच्या विरुद्ध दिशेने चालवणे. तुम्हाला त्यांच्या जीवाची पर्वा आहे की नाही का हा फक्त व्यवसाय आहे आणि हे सर्वकाही नेहमीप्रमाणेच चालत राहिल का? ', असं म्हणत अभिनेत्याने ‘स्विगी’ची कान उघडणी केली आहे. (Bollywood Actor)

अभिनेत्याच्या ट्वीटवर ‘स्विगी केअर’ कडूनही प्रतिक्रिया आलेली आहे. ' हॅलो रोनित, आम्ही आमच्या सर्वच डिलेव्हरी बॉयला ट्राफिक नियमांचे पालन करण्यासाठी सांगतो. त्यांनी त्या नियमांचे पालन करायला पाहिजे. तुमच्याकडे अधिकची माहिती असल्यास आवश्यक कारवाई करण्यासाठी माहिती शेअर करा.' असं उत्तर ‘स्विगी केअर’ कडून अभिनेत्याला मिळालेलं आहे. रोनित रॉयच्या ह्या ट्विटवर काही युजर्सने कमेंटही केल्या आहेत. सध्या अभिनेत्याच्या ह्या ट्विटची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जोरदार चर्चा सुरू आहे. (Bollywood Film)

Ronit Roy Gets Angry
...म्हणून ती अद्भुत अभिनेत्री आहे, Saie Tamhankar च्या अभिनयावर Bhumi Pednekar फिदा

हिंदी टेलिव्हिजनसृष्टीत 'मिस्टर बजाज' आणि 'मिहीर' फेम अभिनेता रोनित रॉयने वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. रोनित रॉयने त्याच्या लग्नाच्या २० व्या वाढदिवशी पत्नी नीलम सिंहसोबत पुन्हा लग्न केलं.

रोनित रॉयने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये रोनितने मिहीरची व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळे त्याला खूपच चांगली पसंती मिळाली होती.

तर 'कसौटी जिंदगी के'मध्ये रोनितने मिस्टर बजाजची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने 'जान तेरे नाम', 'कहने को हमसफर', 'काबिल' आणि 'बॉस' यामध्ये देखील काम केले आहे. (Entertainment News)

Ronit Roy Gets Angry
Sonalee Kulkarni ने 'मलाइकोट्टाई वालिबान'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com