Pooja Bhatt Divorce News: अभिनेत्री पुजा भट्ट सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ मुळे सध्या बरीच प्रकाशझोतात आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली पुजा भट्ट सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरात मित्रांसोबत करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक घटनांचा खुलासा करताना दिसली. नुकतंच पूजाने जिया शंकरसोबत बोलत असताना, लग्नाच्या ११ वर्षानंतर मोडलेल्या संसाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.
यावेळी पुजाने जियासोबत बोलत असताना, ११ वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणं हा किती मोठा आणि कठीण निर्णय होता यावर तिने भाष्य केलं आहे. पूजा भट्ट म्हणते, “घटस्फोटामुळे मी माझ्या आयुष्यातून खचून गेले आहे. त्यातून स्वत:ला सावरणं माझ्यासाठी खूप कठिण झाले होते. लग्नाच्या ११ वर्षानंतर माझ्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. जरीही निर्णय माझा असला तरी, तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मला संसार पुढे कायम ठेवण्याची इच्छा नव्हती. माझं आयुष्य मला आरामात आणि तणावमुक्त घालवायचं होतं.”
माझा पती वाईट माणूस नाही. आमच्या नात्यात सर्व काही आलबेल सुरू होतं. पण, मला नेहमी वाटायचं की, मी स्वत:ला गमावलंय. आणि स्वत:ला गमावणं कोणासाठीच चांगलं नाही. मला स्वत:ला पुन्हा मिळवायचं होतं. घटस्फोटाचा निर्णय माझ्यासाठी खूपच वाईट काळा होता. आमच्या लग्नात काहीच चांगलं झालं नव्हतं. आपल्या लाईफ पार्टनरसोबत खोटं बोलून का जगावं? या प्रश्नाचा सखोल विचार केला आणि आम्ही वेगळे झालो. लग्न म्हणजे ड्रेस रिहर्सल नव्हती, आपल्याला फक्त एकच संधी मिळते.”
पूजा भट्टच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, मनीष आणि पूजाने २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी प्रेमविवाह केला होता. मनीष भारतीय व्हीजे आणि मुंबईतील रेस्टॉरंटचे मालक आहेत. पूजा आणि मनीष पहिल्या भेटीमध्येच खूप चांगले मित्र झाले. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी दोघांनीही लग्न केलं. मात्र, लग्नाच्या ११ वर्षानंतर म्हणजे २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.