

Shah Rukh Khan: सध्या काही दिवसांपासून 'पठान' हा चित्रपट चांगलाच टिकेचा धनी ठरला आहे. चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित होताच त्याच्यावर बऱ्याच जणांनी टिका केली. दीपिकाच्या भगव्या रंगातील बिकीनीमुळे चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकल्यानंतर हा चित्रपट किती कोटींची कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. अवघ्या काही दिवसांवर चित्रपटाचे प्रदर्शन राहिले असून चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
आतापर्यंत चित्रपटातील दोन गाणे प्रदर्शित करण्यात आले असून गाण्यांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. जरी नेटकऱ्यांकडून दोन्ही गाणे ट्रोल होत असले तरी, अनेक कोटींमध्ये दोन्ही गाण्यांना व्ह्युज आहेत. आता चित्रपाटाचा ट्रेलर केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. सध्या शाहरुख आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याने रविवारी सोशल मीडियावर 'AskSRK' नावाचा एक क्विझ ठेवला होता. त्यात त्याने अनेक मजेशीर उत्तरं दिली आहेत.
यामध्ये त्याला 'चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार' असा प्रश्न विचारला असता, त्यावर शाहरुख म्हणतो, 'हो मला खूप इच्छा आहे, लवकरच चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.' अनेक जणांनी त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. तर काही मजेशीर प्रश्न ही त्याला विचारण्यात आले होते. शाहरुखने ठेवलेले 'AskSRK' हे क्विझ त्याने फार कमी वेळेसाठीच ठेवले होते. सोबतच काल त्याने आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या आणि क्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.
शाहरुख काल सोशल मीडियावर म्हणतो, "मी आता जात आहे, कारण माझा लहान मुलगा मला कॉल करत आहे. तुम्हा सर्वांचे आभार. तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि माझ्या ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनाच येणारे हे नववर्ष आनंदात, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो.... सर्व आनंदीत आणि खुश राहा."
शाहरुख खान सध्या 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये शाहरुख 'पठान'चे प्रमोशनही करतोय. चित्रपटात शाहरुख , दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.